घरमुंबईमहापालिका शाळांमध्ये लवकरच समुपदेशकांची नेमणूक

महापालिका शाळांमध्ये लवकरच समुपदेशकांची नेमणूक

Subscribe

शिक्षण विभागाच्यावतीने संस्थांकडून निविदा मागवणार

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांवरील ताणतणाव करण्यासाठी लवकरच सर्व शाळांमध्ये समुपदेशक नेमण्यात येणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांना प्रबोधन व प्रशिक्षणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेवून महापालिका शिक्षणाधिकार्‍यांमार्फत विविध संस्थांकडून निविदा मागवून या शैक्षणिक वर्षांपासून समुपदेशकांची नेमणूक करण्यात येईल,असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असतात. अशा विद्यार्थ्यांना आजुबाजुचे वातावरण, घरातील समस्या याचा नकळत परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्याचा ताण त्यांच्या मानसिकतेवर पडत असतो. त्यामुळे एखादा विद्यार्थी असा का वागतो किंवा त्याला कोणत्या अडचणी आहेत हे जाणून घेणे आवश्यक असते. काही दिवसांपूर्वी के.डी.गायकवाड महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीवर शिक्षकाने हात उचलल्याने त्या विद्यार्थिनीने मानसिक तणावाखाली येवून आत्महत्या केली.

- Advertisement -

शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी मागील वर्षी महापालिका शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या सुचनेवर अभिप्राय देताना शिक्षण विभागाने, त्यांच्या पत्रातील सारांश लक्षात घेता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांचे प्रबोधन व प्रशिक्षण होणे गरजेच असल्याने समुदपदेशक नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी व शिक्षक तसेच पालक यांच्यातील दुवा म्हणून समुपदेशकांचे कार्य महत्वाचे राहिल,असेही त्यांनी म्हटले आहे.

का गरज आहे समुपदेशानाची?

अनेकदा विद्यार्थी शाळेच्या वातावरणात तर कधी अभ्यासात रमत नाही. तर कधी कधी बाहेरच्या आकर्षणाला बळी पडतात. तर काही वेळा वयाचा दोष कारणीभूत ठरतो. यात शाळेचा अथवा शाळेच्या वातावरणाचा किंवा विद्यार्थ्याचा दोष नसतो. तसेच त्यांना कोणाकडे आपल्या भावना व्यक्त करायच्या किंवा भावना व्यक्त केल्यावर त्याचे काय परिणाम होतील याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असतो,असे मत शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -