घरताज्या घडामोडीमहापालिका आयुक्तांना दुरदृष्टी नाही

महापालिका आयुक्तांना दुरदृष्टी नाही

Subscribe

नियोजनाच्या अभावामुळे प्रकल्पांचे खर्च वाढतो - रवी राजा

मुंबई महापालिकेच्या अनेक मोठ्या विकासकामांचा खर्च वाढू लागला आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्यापूर्वीच कामांचा खर्च वाढत आहे.महापालिका प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव असून दुरदृष्टी नसल्याने विकासकामे रखडली जात आहेत. परिणामी खर्च वाढत असल्याचा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२०-२१च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून शुक्रवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्या भाषणांत प्रशासनाचा समाचार घेतला. मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प आनंदाचा आहे,असे म्हटले आहे. पण कोणत्यादृष्टीकोनातून हा अर्थसंकल्प आनंदाचा आहे,असा सवाल करत राजा यांनी पाणी, प्राथमिक शिक्षण, पर्यावरण, उद्यान, मैदान,आरोग्य कुठल्याही मुद्दयांबाबत मुंबईकर आनंदी नसल्याचे सांगितले. महापालिकेने मुदत ठेवीतून पैसे काढून अर्थसंकल्पाचा आकार २७०० कोटींनी वाढल्याने चिंताही व्यक्त केली. कोस्टल रोडचा खर्च ४५०० कोटींनी वाढला आहे, तर गोरेगाव -मुलुंड लिंक रोडचा खर्च ४०० कोटींनी वाढला आहे. तर मलजल प्रक्रिया केंद्राच्या काढलेल्या निविदा रद्द केल्या जात आहेत.त्यामुळे प्रशासनाला ज्याला फेव्हर करायचे असते, त्याच निविदा उघडल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी प्रशासनावर केला.

भुयारी जलवाहिनींची कामे अजुनही रखडलेली असून जे कंत्राटदार कामचुकार करत आहे,त्यांना काळ्या यादीत टाकले जावे,अशी सूचना त्यांनी केली. सायकल दिसत नाही की ट्रॅक दिसत नाही,असे सांगत ट्रॅकची संकल्पना मांडणार्‍या महाराष्ट् ट्रॅकमध्ये जावून बसले आहेत. मग या आयुक्तांना या ट्रॅकमध्ये स्वारस्य आहे का अशी विचारणा करत मिठी नदीचे काम आधी ८० मीटर लांबीचे हाती घेण्यात आले होते, आता ते १२० मीटर एवढी केली आहे.

- Advertisement -

जकात बंद झाला असून याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी जीएसटीची रक्कम २०२२पर्यंत मिळणार आहे, मग पुढे काय असा सवाल करत राजा यांनी मालमत्ता कराची वसुली फेब्रुवारी-मार्चमध्ये करण्याऐवजी एप्रिल आणि जुनपासूनच केली जावी,अशी सूचना केली. तसेच ५०० चौरस फुटांच्या घरांना पूर्ण करमाफी मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेत ठराव करून पाठवला जावा,अशीही सूचना त्यांनी केली.

विकास नियोजन खात्यातून मिळणारा महसूल कमी होत असून धारावी विकास प्रकल्पातून प्राप्त होणार्‍या महसुलातील ५० टक्के महसूल महापालिकेला मिळावा,अशीही सूचना त्यांनी केली. राज्य सरकारकडे जे ४३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्या रकमेच्या वसुलीसाठीही प्रयत्न केला जावा,अशी सूचना त्यांनी केली. याबरोबरच येस बँकेत १०० कोटी रुपयांची मुदतठेव असून ती रक्कम कशी मिळणा असा सवाल करत राजा यांनी अ‍ॅक्सिस बँकेत ठेवीअंतर्गत असलेली ३०० कोटी रुपयांची रक्कम काढून घ्यावी,अशीही सूचना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -