घरमुंबईनायरमध्ये लकव्यावर अत्याधुनिक उपचार

नायरमध्ये लकव्यावर अत्याधुनिक उपचार

Subscribe

लकवा झालेल्या रुग्णांसाठी नायर हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागातर्फे बायप्लेन डिजिटल सबट्रक्शन अँजियोग्राफी विभाग सुरू करण्यात आला आहे.

काही वर्षांपासून आपल्या समाजात हृदयविकारग्रस्त रुग्णांप्रमाणे लकवा (पॅरालिसीस), मस्तिष्क-आघात आणि त्याचे परिणाम सोसावे लागणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक तरुण लकव्यामुळे विकलांग झाले आहेत. कुटुंबातील कमवता सदस्य विकलांग झाल्याने कित्येक कुटुंब सामाजिक-आर्थिक दुर्दशेच्या फेर्‍यात सापडतात. अशा रुग्णांसाठी नायर हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागातर्फे बायप्लेन डिजिटल सबट्रक्शन अँजियोग्राफी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाचे आज, शुक्रवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.

ब्रेनस्ट्रोकचे दररोज ओपीडीला ५ ते ६ रुग्ण येतात. त्यामुळे आता अशा रुग्णांना या विभागातून तात्काळ उपचार पुरवणं शक्य होणार आहे. मुळ पद्धतीमध्ये रुग्णाला बरं होण्यासाठी जवळपास ३ ते ६ महिने लागत होते. पण, आता रुग्ण २४ तासात बरा होऊ शकतो. त्यासाठी त्याला एका इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि या मशीनमुळे मेंदूत असणाऱ्या गुठळीला स्टेंटटच्या साहाय्याने बाहेर काढता येणं शक्य होणार आहे. शिवाय, या बनवलेल्या विभागामुळे न्यूरोसर्जनलाही काम करणं सोपं होणार आहे. “
– डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

- Advertisement -

पालिकेच्या नायरमध्ये विशेष केंद्र

लकवा, पक्षाघाताचा झटका आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार झाले नाही तर त्या व्यक्तीला कायमच अपंगत्त्व येऊ शकतो. त्यामुळे लकवा, पक्षाघाताचा झटका येणार्‍या व्यक्ती अशा व्यक्तींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी विभागातर्फे ‘अँडोव्हॅस्कुलर न्यूरोसर्जरी सेंटर’ म्हणजेच ‘बायप्लेन डिजिटल सबट्रक्शन अँजियोग्राफी’ केंद्र सुरू करण्यात आला आहे.

पक्षाघाताबाबत रुग्णांना तातडीने मदत

एखाद्या व्यक्तीला मोठा झटका किंवा रक्ताची मोठी गाठ असल्यास ती विरघळणे अवघड असते. त्यामुळे, या अत्याधुनिक मशीनद्वारे उशिरा येणार्‍या रुग्णांच्याबाबतीत २४ तासांपर्यंत अँजिओग्राफीमार्फत ही रक्ताची मोठी गुठळी काढता येणं शक्य होणार आहे. या केंद्रातर्फे अँडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट, इंटेंसिव्हीट, रेडिओलॉजिस्ट, रिहॅबिलिटेशन थेरपिस्ट आणि डाएटीशियन या सर्वांच्या मदतीने या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. पक्षाघाताबाबत रुग्णांना तातडीने मदत मिळावी, यासाठी हॉस्पिटलतर्फे हेल्पलाईन क्रमांक ०२२-२३०२७००० देण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्या प्रमाणे हार्ट अटॅक पहिला एक तास हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे, एम्बोलिक स्ट्रोकनंतर पहिले सहा तास अतिशय महत्त्वाचे असतात. वैद्यकीय औषधोपचार जे रक्तातून पुरवले जातात. ज्यायोगे रक्तातील गुठळी विरघळण्यास मदत होते. जर ही गुठळी विरघळून गेली नाही तर डीएसए या कार्यपद्धतीनुसार मेकॅनिकल थ्रोम्बोक्टॉमीद्वारे ही गुठळी काढली जाईल. या उपचार पद्धती अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत. रुग्णाला सरकारी आरोग्य सुविधांमार्फत मदत केली जाणार आहे.
– डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख, नायर रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -