घरमुंबईगुंतवणुकीचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक

गुंतवणुकीचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक

Subscribe

कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी करुन एका ४८ वर्षांच्या व्यक्तीला सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार मुंबईतील वडाळ्यात उघडकीस आला आहे.

कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी करुन एका ४८ वर्षांच्या व्यक्तीला सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार मुंबईतील वडाळ्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या या तिघांचा आता पोलिसांकडून शोध सुरु आहे. अमित अनिल परुळकर हे गिरगाव येथील जेएसएस रोडवरील डिनडेझी अपार्टमेंटमध्ये राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची तिन्ही आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीत या तिघांनी त्यांच्या मालकीची एस्पायर इन्फ्रो प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत ते तिघेही संचालक म्हणून कार्यरत आहेत, असे सांगितले होते.

खोटी कंपनी बनवत केली फसवणूक

त्यांच्या कंपनीच्या करन्सी ट्रेडिंग योजनेत पैसे गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळवून देऊ, असे सांगून त्यांनी अमित परुळकर यांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कंपनीत २७ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम त्यांनी त्यांच्या संमतीशिवाय स्माईली बुड्स या कंपनीत गुंतवणूक केली होती, हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्याने या तिघांनी त्यांना दोन लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित २५ लाख ६० हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करीत होते. या तिघांकडून आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच त्यांनी आरएके मार्ग पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी कंपनीच्या तिनही संचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -