घरमुंबईनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण; नग्न करुन पोलिसांनी केली मारहाण

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण; नग्न करुन पोलिसांनी केली मारहाण

Subscribe

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने गंभीर आरोप केले आहेत. एटीएसने नग्न करुन पट्ट्याने आणि काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोपी आरोपीने न्यायालयात केला आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक असलेल्या आरोपीने एटीएसकडून नग्न करुन मारहाण केली जात असल्याची तक्रार केली आहे. एटीएसच्या ताब्यात असलेल्या सुजीतकुमार याने सोमनारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान तक्रार केली आहे. पोलीस कोठडीत बेल्टने आणि काठीने छताला लटकवून बेदम मारहाण केली जात असल्याचे सुजीत कुमारने सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरमयान सुजितकुमारच्या तक्रारीची मुंबई सत्र न्यायालयाने दखल घेतली. सुजित कुमारला जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले.

पोलिसांनी कोठडीत मारहाण केली

गौरी लंकेश हत्या प्रकरणात सुजितकुमारला कर्नाटक एसआयटीने अटक केली होती. सध्या तो एटीएसच्या ताब्यात आहे. सुजितकुमारची एटीएस कोठडीत वाढ करण्यासाठी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान त्याने न्यायालयात पोलिसांनी पट्ट्याने आणि काठीने खूप मारहाण केली असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायाधिशांनी त्याला जे जे रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात धुळ्यातून एटीएसने अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी यांना देखील न्यायालयात हजर करण्यात आले होते. २५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या दोघांनी रेकी करण्यासाठी वापरलेल्या बाईक नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या बाईक कर्नाटकातून चोरण्यात आल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -