घरमुंबई'या' नेत्याला राज यांची एकत्र पक्षस्थापनेची ऑफर

‘या’ नेत्याला राज यांची एकत्र पक्षस्थापनेची ऑफर

Subscribe

महाराष्ट्र्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या आत्मचरित्रातून आता एकावर एक गौप्यस्फोट करत असून, आता २००६ साली एकत्र येऊन पक्ष स्थापन करू अशी ऑफर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचे राणेंनी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटलं आहे. मात्र राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत माहित असल्याने आपण ती ऑफर नाकारल्याचे देखील राणे यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरेंसोबत शिवसेनेचे ३८ आमदार होते. मात्र २००५ साली शिवसेना सोडल्यानंतर ३८ ऐवजी प्रत्यक्षात १३ आमदारांनीच पक्ष सोडल्याचे राणे आपल्या आत्मचरित्रात म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आत्मचित्राचे प्रकाशन

दरम्यान, या आत्मचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, लवकरच या आत्मचरित्रामध्ये आणखी काय काय दडलंय हे सर्वांच्या समोर येईल. या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेना, काँग्रेस आणि आता मिळालेली भाजपाकडून राज्यसभा या सर्वांवर लिहिले असल्याची माहिती मिळत आहे. ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाने हे आत्मचरित्र आता सगळ्यांच्या समोर लवकरच येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -