घरदेश-विदेशया शाळेत फी म्हणून स्वीकारला जातो प्लॅस्टिक कचरा

या शाळेत फी म्हणून स्वीकारला जातो प्लॅस्टिक कचरा

Subscribe

फी आकारणाऱ्या इतर शाळांप्रमाणेच आसाममधील या शाळेतही मुलांकडून फी आकारली जाते, पण ती असते प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या स्वरूपात. येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर आठवड्याला टाकाऊ प्लॅस्टिकच्या किंवा प्लॅस्टिक कचरा असलेल्या किमान २५ वस्तू शाळेत जमा कराव्या लागतात. अक्षर असे या अनोख्या शाळेचे नाव असून आसाममधील जंगली प्रदेशात असलेल्या पमोही येथे ही शाळा भरते. सध्या या शाळेत ४ ते १५ वयोगटातील सुमारे १०० मुले शिक्षण घेतात.

‘खरे तर आम्हाला ही शाळा मोफतच सुरू करायची होती, पण नंतर या भागातील प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या लक्षात घेता पर्यावरण आणि आरोग्य जागृतीसाठी आम्ही हा अनोखा प्रयोग करायचे ठरविले.’ सामाजिक कार्यकर्ती आणि या शाळेची सहसंस्थापक असलेली परमिता सर्मा सांगत होती. तिच्यासारख्याच समविचारी असलेल्या माझीन मुख्तार या तरुणासोबत मिळून ही शाळा स्थापन केलीय. या भागात खरे तर लोकांना मजूरी व अन्य कामे करूनच पोट भरावे लागते. परिस्थितीमुळे मुलांनाही शिकता येत नाही. त्यांना रोजगाराला जावे लागते. मात्र त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे या हेतूने अक्षर या २०१६ मध्ये शाळेची स्थापना झाली.

- Advertisement -

माझीन हा न्यूर्याकहून २०१३ मध्ये मुंबईत आला तेव्हा त्याला वंचितांच्या शिक्षणासाठी काही तरी करायची इच्छा होती. त्याचवेळेस त्याची ओळख टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची पदवीधर असलेल्या आणि मूळची आसाममधील असलेल्या परमिताशी झाली. त्यानंतर दोघांनी मिळून ही शाळा सुरू केली. सोबत पर्यावरणाचा विचार होताच. त्यातूनच प्लॅस्टिक कचऱ्याची ही अनोखी कल्पना पुढे आली. पूर्वी येथील लोक कडाक्याच्या हिवाळ्यापासून दिलासा मिळण्यासाठी म्हणून प्लॅस्टिकचा कचरा अक्षरश: जाळत असत. प्रदुषण, पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांच्या दृष्टीने ही फारच भयावह स्थिती होती. मात्र नंतर मुलांच्या माध्यमातून त्यांच्यात जागृती सुरू करण्यात आली. आता हा प्रकार कमी झाला आहे. लोकांमध्ये हळूहळू जागृती येत आहे.

- Advertisement -

सर्व मुले मजुरांची किंवा स्वत; काम करणारी असल्याने त्यांना उपयोगी पडेल असे शिक्षण या शाळेत मिळते. तसेच शाळेची शिक्षण पद्‌धतीही मुलांच्या कलानेच आखण्यात आली आहे. या ठिकाणी मुलांची गरिबी स्थिती लक्षात घेता, त्यांच्याकडून पैसे न घेण्याचे पूर्वीच ठरले होते. त्याऐवजी त्यांना रोजच्या गरजेसाठी जसे की नाष्टाचे पदार्थ, खाऊ, शालेय वस्तू इत्यादीसाठी मुलांकडून जुनी टाकाऊ खेळणी किंवा प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तू घेण्यात येतात. मात्र जेव्हा त्यापेक्षा इतर काही वस्तू त्यांना हव्या असतात, त्यासाठी त्यांच्याकडील प्लॅस्टिक कचरा घेऊन त्या बदल्यात त्यांना पैसे दिले जातात किवा त्यांना लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन दिल्या जातात. विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या प्लॅटिकचा पुनर्वापर केला जातो. मुले आपल्या शिक्षकांना टाकाऊ प्लॅस्टिकपासून विविध रचना तयार करण्यासाठी मदत करतात. आता या शाळेचा आणि पर्यावरण जागृतीचा उद्देश सफल होत आहे. मुलांमुळे पालकांमध्येही पर्यावरण आणि शिक्षणाबद्दल जागृती येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -