घरमुंबईराष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेमुळे मोठा फटका बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला फार मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सचिन अहिर यांचे मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अहिर शिवसेना प्रवेशावर ठाम आहेत. अहिर यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मत मांडले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेतेही तिथे उपस्थित होते. त्यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

शिवसेनेची सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत सचिन अहिर शिवबंधन बांधणार आहेत.

- Advertisement -

कोण आहेत सचिन आहेर?

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईतील मोठा चेहरा आहे. २००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर वरळी मतदारसंघातून उमेदवारी लढवली होती. त्यावेळी त्यांचा विजय झाला होता. याशिवाय ते राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री देखील झाले होते. दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -