घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीला खिंडार; सचिन अहिर नंतर 'हा' आमदारही पक्षांतराच्या तयारीत

राष्ट्रवादीला खिंडार; सचिन अहिर नंतर ‘हा’ आमदारही पक्षांतराच्या तयारीत

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता पुन्हा पक्षांतराच्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी पक्षांतर केले होते. यासोबतच राष्ट्रवादीच्या बऱ्याच बड्याच नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. यात रणजित सिंग मोहिते पाटील मोठे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पक्षांतराचे राजकीय नाट्य झाले होते ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या नाट्याला सुरुवात झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड देखील भाजपच्या मार्गावर आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित

- Advertisement -

वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट

वैभव पिचड यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे वैभव पिचड भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आहेत. त्यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीचे फार मोठे नुकसान होणार आहे. कारण अकोल्यात त्यांचे चांगले वर्चस्व आहे.

ncp mla vaibhav pichad may join bjp soon
राष्ट्रवादीला खिंडार; सचिन अहिर नंतर ‘हा’ आमदारही करणार पक्षांतर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -