घरमुंबईविजय सिंग मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी मानव अधिकार आयोगात केस लढणार

विजय सिंग मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी मानव अधिकार आयोगात केस लढणार

Subscribe

वडाळा पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेतली. विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

काय आहे नेमके प्रकरण?

नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोग कार्यालयात जाऊन मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सईद आणि अतिरिक्त सचिव व्ही. के. गौतम यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी निवेदनात म्हटले होते की, वडाळा ट्रक टर्मिनल ठाण्यात विजय सिंग या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीत मृत्यू झाला. मात्र मारहाणीनंतर त्याला उपचार करण्यासही टाळाटाळ करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यामुळेच विजय सिंग या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि विजय सिंग याच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. दरम्यान, मानव अधिकार आयोगाची भेट घेतल्यानंतर आणि राष्ट्रवादीमार्फत तक्रार दाखल केल्यानंतर मानव अधिकार आयोगाने १४ नोव्हेंबर २०१९ ही तारीख दिली आहे. या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अॅड. आनंद काटे ही केस लढवणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, बबन कनावजे, हिंदी भाषिक संघटनेचे सचिव पारसनाथ तिवारी, बाप्पा सावंत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -