घरमुंबईज्यू समुदायाच्या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत वाढ हवी

ज्यू समुदायाच्या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत वाढ हवी

Subscribe

मुंबईतील ज्यू समुदायाच्या प्रार्थना स्थळाची सुरक्षितता आणखी मजबूत होणे गरजेचे आहे, असे मत सर जेकब ससून अ‍ॅण्ड अलाईड ट्रस्टचे अध्यक्ष सोलोमॉन सोफर यांनी व्यक्त केले. सध्याच्या सुरक्षिततेत आणखी सुधारणा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जेएसडब्ल्यू ग्रुपने केनेसेथ एलियाहू सिनेगॉगचा जीर्णोद्धार पूर्ण केला आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईतील कलाप्रांताच्या हृदयस्थानी असलेला केनेसेथ एलियाहू सिनेगॉग ही श्रेणी २ अ मधील वास्तू आहे. १९९५ सालच्या हेरिजेट रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर बॉम्बे नियमांचे संरक्षण या वास्तूला आहे. गोसलिंग आणि मॉरिस या मुंबईतील स्थापत्यविशारदांनी या सिनेगॉगचे मूळ डिझाइन केलेले आहे. जेएसडब्ल्यू ग्रुप, सर जेकब ससून अ‍ॅण्ड अलाइड ट्रस्ट, काळाघोडा असोसिएशन आणि वर्ल्ड मॉन्युमेंट फंड यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सिनेगॉगची मूळ भव्यता पुन्हा निर्माण करण्यात आली आहे. या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी पाच कोटी रूपयांचा खर्च आला आहे.

- Advertisement -

आभा नरैन लांबा यांनी बॉम्बे सिनेगॉग प्रकल्पाच्या मुख्य कंझर्वेशन आर्किटेक्ट म्हणून काम पाहिले, तर श्रीमती स्वाती चंदगडकर यांनी स्टेण्ड-ग्लास पॅनल्सवर काम केले. ही वास्तू म्हणजे भारतातील सर्वांत महत्त्वाच्या ज्युइश सिनेगॉग्जपैकी एक असून, मुंबईतील बगदादी आणि बेने इस्त्रायली ज्युईश समुदायाचे ते प्रार्थनास्थळ आहे. केनेसेथ एलियाहू सिनेगॉग ७ फेब्रुवारीला ज्युईश समुदायाला तसेच मुंबईच्या सांस्कृतिक वारशाला अर्पण करण्यात येणार आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -