घरमुंबईवीज वाचवण्यासाठी ‘गेम थियरी’

वीज वाचवण्यासाठी ‘गेम थियरी’

Subscribe

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत असली तरी अनेक राज्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येते. वीज पुरवठा घरोघरी पोहचवण्यासाठी वीज वितरण, पारेषण करणारी उपकेंद्रे आणि तारांचे जाळे असते. त्यामुळे भारनियमन टाळण्यासाठी या पद्धतीवर संशोधन होते. परंतु वीज निर्मितीवर आधारित विजेचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते व भारनियमनातून सुटका होऊ शकते, असे आयआयटीचे संशोधक प्रा. अंकुर कुलकर्णी यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केले आहे.

दिव्याचे बटण दाबल्यावर त्वरित दिवा कसा सुरू होतो. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? कोणतेही विद्युत उपकरण वापरण्यासाठी आपण बटण दाबले की वीज उत्पादन केंद्रातील इंधन जास्त जळते व आपल्याला लागणारी वीज मिळते. पुरवठा आणि मागणी याचे संतुलन नसेल तर वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. पुरवठा व मागणी यामधील असंतुलनामुळेच देशाच्या अनेक भागांत भारनियमन करण्याची वेळ येते. यावर तोडगा काढण्यासाठी निर्मितीवर आधारित विजेचा वापर करण्याची संकल्पना मांडताना प्रा. कुलकर्णी यांनी ‘गेम थिअरी’चा शोध लावला आहे.

- Advertisement -

कोणत्याही खेळात सर्व खेळाडू उपलब्ध असलेली संसाधने वापरण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपली रणनिती ठरवताना अन्य खेळाडूही आपापली रणनिती ठरवत असतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपल्याला अधिकाधिक लाभ सर्वाधिक व्हावा यासाठी स्वतंत्रपणे किंवा गटाने प्रयत्न करत असतात. तेव्हा निर्माण होणार्‍या परिस्थितीप्रमाणे ‘गेम थिअरी’ वापरली जाते. त्याचप्रमाणे विजेच्या जाळ्याचे व्यवस्थापन करताना ‘गेम थिअरी’ वापरल्यास पुरवठादाराला सर्वाधिक नफा, ग्राहकांना अत्यंत कमी खर्च आणि विजेचा कमीतकमी अपव्यय होईल. असेही कुलकर्णी यांनी सांगितले. विजेच्या पुरवठ्यात बदल झाला की विजेची मागणी कमी-जास्त करण्याची संकल्पना गेम थियरी चौकटीत बसवता येते, असे डॉ. कुलकणी यांनी सांगितले.

ग्राहकांची संख्या, ऊर्जेची किंमत आणि एकूण उपलब्ध ऊर्जा या सर्व घटकांसाठी सर्वसाधारण आकडेवारी धरली तरी नॅश इक्विलिब्रियम शोधून काढता येतो. इक्विलिब्रियम परिस्थितीमध्ये येण्यासाठी घटकांचे मूल्य बदलले की पुरवठ्यावर आधारित मागणी ही स्थिर होते. ही स्थिर स्थिती निर्माण झाली तर आधुनिक वीज वितरण प्रणालीचा योग्य आणि एकत्रित वापर करता येणे शक्य होईल म्हणजे अशी वितरण प्रणाली विकसित करणे शक्य आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितली.

- Advertisement -

ग्राहकांनी पुरवठ्यानुसार किंवा पुरवठादाराने दिलेल्या माहितीनुसार आपली मागणी बदलली तर विजेचा होणारा तुटवडा किंवा भारनियमन टाळणे शक्य होईल. परंतु गणिताच्या परिणामांवर अधिक काम करायला हवे आणि आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित करायला हवे.
– प्रा. अंकुर कुलकर्णी, संशोधक, आयआयटी मुंबई

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -