घरमुंबईउद्या होणार ‘महा’विज्ञानाची सफर

उद्या होणार ‘महा’विज्ञानाची सफर

Subscribe

तज्ज्ञांकडून होणार विशेष मार्गदर्शन ,नेहरु विज्ञान केंद्राची बच्चे कंपनीसाठी विशेष सफर

गेल्या अनेक दिवसांपासून वाचकांचे लक्ष लागून राहिलेल्या दै.आपलं महानगरच्या चला विज्ञानाच्या विश्वात या विशेष कार्यक्रमाची अंतिम दिवसाची घोषणा अखेर सोमवारी करण्यात आली. बच्चे कंपनींसाठी आयोजित हा विशेष उपक्रम येत्या १२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सुरु होणार आहे. या उपक्रमांतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्रात विशेष सफर आयोजित केली असून त्यानुसार विज्ञानातील अनेक गंमती जमती विद्यार्थ्यांना ‘आपलं महानगर’ सोबत अनुभवता येणार आहे. या विशेष उपक्रमात भाग घेण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून अद्याप ज्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करुन घ्यायची आहे.

मुंबईसह राज्यातील विद्यार्थी सध्या उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत आहेत. या सुट्टीत नेमके कुठे जावे, असा प्रश्न नेहमी विद्यार्थ्यांसह पालकांना देखील पडतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर शोधताना दै. आपलं महानगरने चला करुया विज्ञानाची सफर या विशेष कार्यक्रमाची घोषणा ‘आपलं महानगर’ने काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेनंतर मुंबईतील विद्यार्थी पालकांनी या उपक्रमाच्या नोंदणीसाठी एकच गर्दी केली होती. या नोंदणीनंतर सर्वांचे लक्ष ही सफर नेमकी कधी निघणार याकडे लागून राहिले होते. अखेर तो दिवस येऊन ठेपला असून १२ जून रोजी ही विशेष सफर पार पडणार आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजता ही सफर सुरु होणार असून यात विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अनेक गंमती जमती अनुभवता येणार आहे. या उपक्रमामध्ये सध्या नेहरु विज्ञान केंद्रात सुरु असलेल्या विज्ञान समागम या प्रदर्शनात देखील सहभागी होता येणार आहे. त्याशिवाय विज्ञान केंद्रातील विविध विषयांच्या १३ गॅलरींमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तर सध्या विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या सायन्स ऑफ स्पेअर या प्रयोगाचे विशेष सादरीकरण देखील यावेळी केले जाणार आहे. याशिवाय विज्ञान केंद्रातील इतर ही महत्वाच्या गोष्टी आणि प्रयोग पाहण्याची सुर्वणसंधी उपलब्ध राहणार आहे.

- Advertisement -

आपलं महानगरने आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी नेहरु विज्ञान केंद्राचे विशेष सहकार्य देखील लाभले असून अनेक शाळांच्या प्राचार्यांनी देखील यासाठी सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या हा उपक्रमात पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नोंदणी पूर्ण केली नसेल तर त्यांना ती मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम मुदत असणार आहे. तरी इच्छुकांनी 022-24446005 या क्रमांकावर संपर्क साधून आपली जागा निश्चित करुन घेण्याचे आवाहन ‘आपलं महानगर’कडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -