घरमुंबईकॉलेजांचे ऑनलाईन प्रवेश

कॉलेजांचे ऑनलाईन प्रवेश

Subscribe

विद्यार्थ्यांच्या सोईसाठी ऑफलाईनचा पर्यायही

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठाकडून प्रथम वर्षे प्रवेशासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर शुल्क भरणे, कागदपत्रे सादर करणे यासारख्या बाबींसाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये फेर्‍या माराव्या लागतात. मात्र ही बाब लक्षात घेऊन काही कॉलेजांनी विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते प्रवेश निश्चित करण्यासाठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच भासत नाही.

सध्याच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट सहज शक्य आहे. त्यामुळे आता कॉलेजांनीही स्मार्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने नाव नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली असली तरी ऑनलाईन नोंदणींनतर विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी, शुल्क भरून प्रवेश निश्चितीसाठी कॉलेजमध्ये जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा कॉलेजचे हेलपाटे मारावे लागतात. परंतु सध्या स्मार्टफोनच्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होत असताना कॉलेजची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करून काही कॉलेजांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यामध्ये कॉलेजांकडून कागदपत्रांची पडताळणी वगळता प्रवेश अर्ज भरण्यापासून ते ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा कॉलेजकडून उपलब्ध करून देण्याचा निर्णय कॉलेजांनी घेतला आहे. ऑनलाईन प्रक्रिया जरी सुलभ असली तरी काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असते किंवा त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनबरोबरच ऑफलाईनही सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांसाठी नेट बॅकिंगऐवजी डीडी व रोख स्वरुपात शुल्क भरण्याची व्यवस्थाही कॉलेजांकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील अनेक नामाकिंत कॉलेजांचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागले आहेत. त्यातच ‘इनहाऊस’ विद्यार्थ्यांची पसंती ही बहुतांशवेळा त्यांच्याच कॉलेजला असते. त्यामुळे इनहाऊस विद्यार्थ्यांची सर्व माहिती त्यांच्या कॉलेजकडे असल्याने त्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन करणे बंधनकारक आहे. तर बाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय कॉलेजांकडून उपलब्ध करून दिले आहेत.

प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ लक्षात घेऊन आम्ही विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नेटबॅकिंगच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये कॉलेजमध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच ऑनलाईन न जमणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रक्रिया राबवण्याचीही सोय आहे
– डॉ. अनुश्री लोकूर, प्राचार्या, रुईया कॉलेज

- Advertisement -

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आम्ही प्राधान्य दिले आहे. तसेच नेटबँकिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे भरण्यात अडचणी आल्यास त्यांना प्लास्टिक मनीच्या माध्यमातून पैसे भरण्याची व्यवस्था केली आहे.
– डॉ. सोनाली पेडणेकर, प्राचार्या, एमसीसी कॉलेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -