घरमुंबईमराठा आरक्षण - अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन वेळापत्रक!

मराठा आरक्षण – अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन वेळापत्रक!

Subscribe

मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर आता राज्य सरकारने ११वी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. या बदलामुळे आरक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकेल.

मराठा आरक्षण कोर्टाने वैध ठरवल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खुल्या प्रवर्गात ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुन्हा SEBC (सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग) आणि EWS (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गामधून अर्ज करण्याची संधी देण्यासाठी वेळापत्रक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. EBC प्रवर्गात ३४ हजार २५१ राखीव जागांपैकी ४ हजार ५५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर EWS प्रवर्गात २८ हजार ६३६ जागांपैकी २ हजार ६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही प्रवर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहण्याची शक्यता असल्याने त्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना प्रवर्ग बदलून अर्ज करण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. ऑनलाईन प्रवेशाचे नवे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्राबाबतही दिली मुभा

हा निर्णय घेत असताना जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना देखील मुभा देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र नसले तरी पालकांचे हमीपत्र स्वीकारले जाणार आहे. शिवाय जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. शिवाय न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या निर्णयावर देखील शिक्कामोर्तब झालं. मात्र, आरक्षणाला मान्यता देत असतानाच हे आरक्षण १६ टक्के न करता १२ ते १३ टक्के असावा, असा नियम न्यायालयाने घालून दिला होता. त्यानुसार १२ टक्के आरक्षण नोकरीमध्ये तर १३ टक्के आरक्षण शिक्षणामध्ये सुरु करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय होईपर्यंत ११वी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे आरक्षणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाचं नवीन वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.


हेही वाचा – मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -