घरक्राइमनवजात अर्भक कचराकुंडीत फेकून मावशीने काढला पळ

नवजात अर्भक कचराकुंडीत फेकून मावशीने काढला पळ

Subscribe

गर्भपातानंतर मोठ्या बहिणीने पाच ते सहा महिन्यांचे नवजात अर्भक कांदिवलीतील रोड क्रमांक पाच, सिंग इस्टेट परिसरातील कंचराकुंडीत फेकून तिथून पळ काढला.

नवजात अर्भकाला कचराकुंडीत फेंकून पलायन करणार्‍या एका 29 वर्षांच्या तरुणीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तिच्या लहान बहिणीचा गर्भपात करुन तिने या अर्भकाला कचराकुंडीत फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तरुणीला समतानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये लवकरच तिच्या लहान बहिणीवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

29 वर्षांची आरोपी ही कांदिवली परिसरात राहते. तिच्या 26 वर्षांच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात शारीरिक संबंध आले आणि ती गरोदर राहिली होती. हा प्रकार समजातच तिने बहिणीच्या मदतीने घरात गर्भपात होण्याचे औषध घेतले होते. गर्भपातानंतर मोठ्या बहिणीने पाच ते सहा महिन्यांचे नवजात अर्भक कांदिवलीतील रोड क्रमांक पाच, सिंग इस्टेट परिसरातील कंचराकुंडीत फेकून तिथून पळ काढला. 29 नोव्हेंबरला हा अर्भक तिथे सफाई काम करणार्‍या राहुल मुकूंदराव मस्के याच्या निदर्शनास आले, त्यानंतर त्याने ही माहिती समतानगर पोलिसांना दिली होती.

- Advertisement -

घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी ते मृत अर्भक ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले होते, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी संमातर तपास करीत होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन एका 29 वर्षांच्या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच ते अर्भक कचराकुंडीत फेंकून दिल्याची कबुली दिली. ते अर्भक तिच्या लहान बहिणीचे होते, ती अविवाहीत असून तिच्या गरोदर असल्याची बातमी स्थानिक रहिवाशांना समजली असती तर समाजात त्यांची बदनामी झाली असती, त्यामुळे त्यांनी घरात औषधे घेऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी या तरुणीला पुढील चौकशीसाठी समतानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या गुन्ह्यांत तिची लहान बहिण सहआरोपी असून तिच्यावर नंतर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अवघ्या अकरा दिवसांत या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश करुन एका तरुणीला अटक केली.


हेही वाचा – बॉडी बनवण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने दिले ड्रग्ज!

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -