घरमहाराष्ट्रकोरोना काळात जाणवले मृत्यूचे भय - अनुपम खेर

कोरोना काळात जाणवले मृत्यूचे भय – अनुपम खेर

Subscribe

न्यूयॉर्कमधून मुंबईत एअरपोर्टला आणि तेथून घरी येताना रस्त्यावर नेहमीच्या गाड्यांचे आवाज, माणसे मला आढळली नाहीत. फक्त स्मशान शांतता दिसून आली.

मुंबईसह भारतात आणि जगभरात कोरोनाचे भीषण वातावरण, निरव शांतता व कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोनाच्या तडाख्यात सापडलेले माझे कुटूंब हे सर्व मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले आहे. मी न्यूयॉर्कमधून मुंबईत एअरपोर्टला आणि तेथून घरी येताना रस्त्यावर नेहमीच्या गाड्यांचे आवाज, माणसे मला आढळली नाहीत. फक्त स्मशान शांतता दिसून आली. त्यावेळी मला माझे कुटूंब, नातेवाईक, खाणेपिणे आणि वायफाय या तीन गोष्टींची नितांत गरज भासली. मला कोरोना काळात मृत्यूचे भय जाणवले. तसेच, बाहेरच्या वातावरणात पक्षी व प्राणी मुक्त संचार करीत होते तर माणसे घरात लॉक ( पिंजऱ्यात) झाल्याचे भयाण वास्तव बघायला मिळाले, असे अभिनेते अनुपम खेर म्हणाले.

याच कोरोनाच्या प्रारंभापासून ते आता कोरोना नियंत्रणात येईपर्यंतच्या कालावधीत घरीच बसल्या बसल्या अनुपम खेर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. कोरोना आपल्यावर, कुटुंबियांवर आणि एकूणच मुंबईकरांवरही कसा भीषण आघात करीत आहे, त्याचे कसे व किती विघातक परिणाम जनजीवनावर झाले, त्यातून नागरिकांना व स्वतःला कशा व काय अडचणी आल्या व त्यावर आपण कशी मात केली, कोरोनामुळे ताणतणाव कसा वाढला आहे, पालिका आयुक्त इकबाल चहल व त्यांच्या पालिका टीमने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजना, मुंबईतील पोलीस,डॉक्टर, आरोग्य यंत्रणा यांनी आपली भूमिका कशी बजावली आणि उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरी कशी केली आहे, याचा उहापोह , अनुभव, वर्णन ” युवर बेस्ट डे इज टुडे” या पुस्तकात दिले आहेत.

- Advertisement -

या पुस्तकाबाबत आणि पालिका आयुक्त , प्रशासन यांच्या कामगिरीबाबत अनुपम खेर यांनी आज पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांसोबत आपले अनुभव व पुस्तकातील लिखाण याबाबतची माहिती दिली. अनुपम खेर यांनी, पालिका प्रशासन, सफाई कामगार, आयुक्त, डॉक्टर आदींना कोरोना योद्धा म्हणून संबोधले आहे.

मी न्यूयॉर्कवरून मुंबईत एअरपोर्टला उतरलो आणि जुहू येथील घरी निघालो तेव्हा रस्त्यावर माणसे काय चिटपाखरूही दिसले नाही. एखाद्या चित्रपटातील सिन वाटत होता. नंतर माझ्या आईला, भावाला, वहिनीला कोरोनाची लागण झाली होती. माझ्या आईला कोकिळाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी मला कोरोनाची भीषणता अनुभवायला मिळाली. तसेच, या कोरोना कालावधीत लोक भयभीत झाल्याचे एवढेच नव्हे तर मी स्वतःही भयभीत झाल्याचे मला अनुभवायला मिळाले, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मी चार महिने कोरोनाच्या कालावधीत घरात बसून पुस्तक लिहिले. वास्तविक,पक्षी,प्राणी हे मुक्त संचार करताना तर माणसांनी स्वतःला सुरक्षिततेसाठी घरात लॉक करून घेतल्याचे आढळून आले. तसेच, माझ्या घराबाहेर मला कोरोना कालावधीत खूप दिवसांनी पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळाला होता. त्यावरून मला कोरोनारुपी काळ्या ढगांच्या मागून एक ‘ सिल्वर लाईन” शोधली आणि मग मी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला, असे अनुपम खेर यांनी सांगितले. माझे हे पुस्तक ज्यांना नैराश्य आले आहे त्यांना स्फूर्ती देईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच, त्यांनी कोकिळेचा आवाजही काढून दाखवला. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत असला तरी कोणत्याही परिस्थितीत माणसाने धीर सोडू नये, खचून जाऊ नये. संकटावर आपल्या धैर्याने मात करायला हवी आहे. तसेच, आपल्या आई व वडिलांची या कोरोनाच्या कालावधीत विषेश काळजी प्रत्येकाने घ्यावि, असे आवाहन अनुपम खेर यांनी यावेळी केले.

माझ्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच निघणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, अनुपम खेर यांनी लिहिलेल्या पुस्तकाबाबत थोडक्यात माहिती पत्रकारांना दिली. त्या पुस्तकात पालिकेने केलेल्या उलखनिय कामगिरीची दाखल त्यांनी घेतल्याचे सांगितले. सदर पुस्तक खूपच वाचनीय असल्याचेही आयुक्त चहल यांनी आवर्जून सांगितले.


हेही वाचा – तोडी कंपाऊंडमधील इपिटॉम हॉटेलमध्ये विना मास्क ६७ ग्राहकांवर कारवाई

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -