घरमुंबईवृत्तवाहिन्यांनी राजकारण्यांची प्रतिमा खराब केली

वृत्तवाहिन्यांनी राजकारण्यांची प्रतिमा खराब केली

Subscribe

विनोद तावडे यांची माध्यमांवर टीका

राजकारणाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार झाली असून याला वृत्तवाहिन्या जबाबदार असल्याचा आरोप शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. चांदीबाई महाविद्यालयात कॉफी विथ युथ, युवा संवाद या कार्यक्रमात सोमवारी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी हा आरोप केला. विद्यार्थ्यांनी शिक्षण, बेरोजगारी आणि शाळा महाविद्यालयाच्या इमारतींच्या दुरवस्था आदी प्रश्नांचा भडिमार या कार्यक्रमात केला. त्याला उत्तर देताना तावडे यांनी हा आरोप केला. ते पुढे म्हणाले देशाची ही परिस्थिती बदलण्यासाठी खरेतर तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, आजचे तरुण हे नोकरी आणि छोकरी यांच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत. जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत समाजाची परिस्थिती बदलणार नाही. तरुणांनी राजकारणात प्रवेश करावा असे सांगतानाच किती विद्यार्थ्यांना राजकारणात प्रवेश करावासा वाटतो, असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला, त्यावेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांनी हात वर केला. हे बघून इतक्या कमी विद्यार्थ्यांना राजकारणात प्रवेश करावासा वाटतो, याचे कारण म्हणजे विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय व्यक्तींच्या बाबत सतत नकारात्मक दाखवल्या जाणार्‍या बातम्या आहेत, हे थांबले पाहिजे असे ते म्हणाले.

शालेय घोटाळ्याला महापालिका जबाबदार
उल्हासनगरमध्ये पडझड झालेल्या शाळेच्या इमारती, प्राथमिक सुविधांचा अभाव,विद्यार्थ्यांना उशिरा मिळणारे शैक्षणिक साहित्य अशा अनेक समस्या असल्याचे स्थानिक पत्रकारांनी विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की हा जो गैरप्रकार झाला आहे. त्याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून राज्य शासनाच्या अखत्यारीतला हा प्रश्न नाही, असे बोलून त्यांनी जबाबदारी टाळली. या कार्यक्रमात चांदीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजू यादव, माजी आमदार कुमार आयलानी , नगरसेवक जमनू पुरुसवानी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -