घरमुंबईमतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

Subscribe

मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणांहून जिह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदानयंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या 120 टक्के बॅलेट युनिट, 113 ते 115 टक्के कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या 127 टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार तुर्भे येथिल स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय वितरण केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार असून त्याद्वारे मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणूक प्रचार अभियानात सहाय्यक आयुक्तांचा सहभाग ?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणूक प्रचारात दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महादेव जगताप हे विद्यमान सरकारला पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील कक्ष अधिकारी वि. पो.थोरात यांनी लेखी स्वरूपात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे.

विधानसभा निवडणुकीत दिवा प्रभाग समितीत पदभार असलेले सहाय्यक आयुक्त महादेव जगताप हे प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याबाबत प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

मला आतापर्यंत तक्रारीचे पत्र मिळाले नाही. मी पालिकेत सहाय्यक आयुक्त आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी तक्रार केल्याचे मला माहित नाही, माझा काय संबंध                                                                -महादेव जगताप, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त पदभार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -