घरमुंबईमला मुलगा झाला...पेढा खा

मला मुलगा झाला…पेढा खा

Subscribe

गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकाला लुबाडले

प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी रिक्षाचालकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी असा 34 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरात राहणार्‍या दीपक खंडागळे (32) या रिक्षाचालकाच्या रिक्षात सकाळी पावणे बाराच्या सुमारास दोन अनोळखी इसम प्रवासी म्हणून आले.

अंबरनाथ पूर्वेकडील अ‍ॅक्सीस बँकेजवळील श्री साईनाथ चालक मालक संघटना रिक्षा स्टॅन्ड ते गोल मैदान उल्हासनगर या प्रवासादरम्यान या दोन इसमांनी त्यांच्यापैकी एकाला मुलगा झाला असल्याची बतावणी केली. तसेच रिक्षाचालकाला मोतीचूर लाडू, छोले भटुरे व भजी पाव यामधून गुंगीचे औषध खाण्यास दिले. त्यामुळे रिक्षाचालकाला भुरळ आल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी चोरून नेली. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विजय पर्‍हाड अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -