घरमुंबईबायको असावी तर शिवसेनेसारखी! - नितेश राणे

बायको असावी तर शिवसेनेसारखी! – नितेश राणे

Subscribe

बायको शिवसेनेसारखी असायला हवी, जी लफडी कळूनसुद्धा नवऱ्याला सोडून जात नाही, अशा स्वरुपाची टीका नितेश राणेंनी शिवसेनेवर केली आहे, ट्विटरवर त्यांनी तसं ट्वीट केलं आहे.

खासदार नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून शिवसेना आणि राणे कुटुंबामध्ये विस्तव देखील जात नाही. एकमेकांवर टीका करण्याची, कुरघोडी करण्याची किंवा चिमटे काढण्याची कोणतीही संधी दोघेही सोडत नाहीत. मग तो सामनाचा अग्रलेख असो, राज्यातल्या निवडणुका असोत किंवा मग कोकणातलं स्थानिक राजकारण असो. आताही नारायण राणेंचे पुत्र आणि सध्या काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी तोच कित्ता गिरवर शिवसेनेला थेट पत्नीची उपमा दिली आहे! ‘शिवसेनेसारखीच बायको असायला हवी’, अशा आशयाचं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे. अहमदनगरमधल्या महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाची आणि राज्यात सेना-भाजपच्या स्वबळावर लढण्याच्या भाषेची या ट्विटला पार्श्वभूमी आहे.

- Advertisement -

लफडी कळूनही सोडत नाही!

दुपारी साडेतीनच्या सुमारास नितेश राणेंनी हे ट्विट केलं आहे. अहमदनगरमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेच्या हाताशी आलेली सत्ता काबीज केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या युतीचे वाभाडे काढले. मात्र, यावरच नितेश राणेंनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना देखील सुनावले आहे. ‘आता नवरे म्हणत असतील, बायको शिवसेनेसारखीच असायला पाहिजे, लफडी कळून सुद्धा नवऱ्याला सोडत नाही’, अशा आशयाचं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.


हेही वाचा – रामदास कदम हे उद्धव ठाकरेंचं पाळलेलं कुत्रं – नितेश राणे

युतीवरून शिवसेनेवर कायम टीका

शिवसेनेकडून वारंवार केली जाणारी स्वबळाची भाषा, भाजपवर कंठरवाने केली जाणारी टीका आणि तरीही सत्तेमध्ये मंत्र्यांना पाठवण्याची अभिलाषा या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर राजकीय विश्वातून कायम तोंडसुख घेतलं जातं. त्यात जर प्रतिस्पर्धी राणेंसारखा शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेला असेल, तर त्यांची टीका देखील तितकीच तिखट आणि जिव्हारी लागणारी असणार यात शंका नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -