घरमहाराष्ट्ररामदास कदम हे उध्दव ठाकरेंचं पाळलेलं कुत्रं - नितेश राणे

रामदास कदम हे उध्दव ठाकरेंचं पाळलेलं कुत्रं – नितेश राणे

Subscribe

राणे नेहमीच मातोश्रीवर टीका करतात पण आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून पाहावं, असं वक्तव्य रामदास कदन यांनी केलं होतं.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी, ‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे आणि हा डाग धुतल्याशिवाय जाणार नाही’, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेवर राणे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्याचंंच लक्ष लागून राहिलं होतं. अखेर नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रामदास कदम हे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं एक कुत्रं आहे’, अशी झोंबणारी टीका नितेश राणेंनी केली आहे. नितेश यांनी आपल्या ट्वीटमधून रामदास कदमांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ‘स्व.मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे.. रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही.. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!’ अशा परखड शब्दांत नितेश यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

- Advertisement -


अशी झाली होती सुरुवात…

रामदास कदम यांनी रत्नागिरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंवर तोंडसुख घेतलं होतं. ”या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता भाजपामध्ये आले. आता त्यांच्यासाठी फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे नेहमीच मातोश्रीवर टीका करतात पण आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून पाहावं. शिवसेनेच्या जोरावरच नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याआधी त्यांनी आपली औकात तपासावी. नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग असून, हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही”. असं कदम म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -