घरमुंबईNitin Desai Suicide : "नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या..."; राष्ट्रवादी काँग्रेस...

Nitin Desai Suicide : “नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या…”; राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा

Subscribe

Nitin Desai Suicide : चित्रपटसृष्टीतील दिग्गज कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Suicide ) यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही हादरून गेली. काही दिवसांपासून ते आर्थिक विंवचनेत असल्याचेही बोलले जात असून, याच विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. देसाई यांच्यावर 252 कोटींचं कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे तर, चित्रपटसृष्टीमधून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता, अशी चर्चा सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. (Nitin Desai Suicide : “Who tortured Nitin Desai their…”; NCP leaders claim)

हेही वाचा – नितीन देसाई यांनी आत्महत्येआधी ‘यांना’ पाठविल्या त्या ऑडिओ क्लीप; मोठा खुलासा होण्याची शक्यता

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नितीन देसाई यांना कोणी छळलं, हे त्यांच्या मित्रांना ठाऊक आहे. एवढेच नाही तर त्यांची आत्महत्या मुंबई एमएमआर रिजनशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आव्हाड म्हणाले की, नितीन देसाई गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत होते. त्यांच्या मित्रांनी याबाबत खुलासा केला आहे. रसेश शाह यांच्या नितीन देसाई यांच्या आत्महत्येशी काहीही संबंध नाही. एडलवाईज या कंपनीची काही संबंध असेल तर त्यांना जेलमध्ये टाका. त्या कंपनीव्यतिरिक्त अजून कोणी नितीन देसाई याना छळलं असेल तर त्यांच्या जवळच्या मित्रांना माहिती असेल. त्यांच्या आत्महत्येप्रकरणई गुजरातचं काही कनेक्शन नाही, मुंबईच्या एमएमआर रिजनशई संबंधित आहे, असेही आव्हाड म्हणाले.

सर्वपत्रीय राजकारण्यांकडून एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी

आज विधानसभेत नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी चर्चा झाली. यावेळी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आशिष शेलार म्हणाले की, केवळ अपघाती मृत्यूची चौकशी न करता नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी एआरसी कंपनी आणि रसेश शहा यांच्या भूमिकेसंदर्भात गरज पडल्यास विशेष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बळजबरीने माप घेतले आणि विरोधी पक्षाच्या नेत्याचा कोट घालून मांडला अर्थसंकल्प; जयंत पाटलांनी सांगितला किस्सा

नितीन देसाई आत्महत्या

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज सकाळी 4 वाजता कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -