घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन 2023मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यांत गुन्हेगारी वाढली, अंबादास दानवेंचे टीकास्त्र

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यांत गुन्हेगारी वाढली, अंबादास दानवेंचे टीकास्त्र

Subscribe

राज्यातील वाढते गुन्हे पाहता नागपूर शहरात 332.91 टक्के तर ठाणे जिल्ह्यात 184.33 टक्के इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. असे म्हणत अंबादास दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाषण करताना सरकारवर टीका केली.

Maharashtra Monsoon Session 2023 : राज्यातील वाढते गुन्हे पाहता नागपूर शहरात 332.91 टक्के तर ठाणे जिल्ह्यात 184.33 टक्के इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या ठाणे, नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई ठाण्यात पहाटेपर्यंत डान्सबार सुरू असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे टीकास्त्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केले. (Crime has increased in the districts of CM Eknath Shinde, Home Minister Devendra Fadnavis, Ambadas Danve criticism)

हेही वाचा – राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा, शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

- Advertisement -

वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला, कायदा सुस्थापित राखण्यास सरकारला आलेले अपयश, राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, विस्कळीत झालेले जनजीवन आदी मुद्द्यांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. पावसाळी अधिवेशनात आज विरोधकांनी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडला. ज्यावेळी अंबादास दानवेंनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत बोलत सरकारवर सडकून टीका केली.

राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे दंगलीच्या घटना, दिवसा मुलींवर होत असलेले हल्ले, अत्याचाराच्या घटना यात वाढ झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील अभियंत्यावर हात उगारणाऱ्या सत्ताधारी आमदार यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारावर कारवाईचा बडगा उचलतो, एक प्रकारे सरकार दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाषण करताना केला.

- Advertisement -

इंग्रजांच्या काळातही झाले नाही अशाप्रकारे या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठीमार झाला. राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या दंगलीच्या घटना या एकप्रकारे कोणी तरी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी करत सरकारच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

यावेळी अंबादास दानवे यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोसळणाऱ्या दरडींबाबत देखील प्रश्न उपस्थित केले. इर्शाळवाडी दुर्घटनेपूर्वी महसूल विभागाकडे तेथील ग्रामस्थांनी वारंवार पुर्नवसनाची मागणी केली. मात्र तिचा विचार केला गेला नाही. सरकार ही दुर्घटना घडण्याची वाट बघत होती का? माधवराव गाडगीळ समिती ने दरड कोसळण्यावर अभ्यास केला होता, त्या कोणत्याही सुचनेची दखल सरकारने घेतली नाही. तळिये गावाचे पुर्नवसन करण्याची गरज असून गाडगीळ समितीच्या सूचनेची दखल सरकारने घेण्याची गरज असल्याचे दानवेंकडून सांगण्यात आले. तसेच दरडी दुर्घटना रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना अवलंबल्या असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -