घरमुंबईभिवंडीत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट ,दोन ठार, चार कामगार जबर जखमी

भिवंडीत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट ,दोन ठार, चार कामगार जबर जखमी

Subscribe

तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमधील इजी मॅकेनिकल कंपनीत बुधवारी दुपारी नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये २ कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४ कामगार जबर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड गाळा नंबर बी ५ वळपाडा येथील जे.ई. मेकॅनिकल कंपनीमध्ये लोखंड कटिंग करण्यासाठी वापरला जाणारा नायट्रोजन गॅसच्या सिलिंडरचा बुधवारी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला.

- Advertisement -

या स्फोटात प्रेम अनंता भोईर (२४), अक्षय अशोक गौतम (२१) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन (रा.भिवंडी), विवेकानंदा बारीकी (रा. वळपाडा भिवंडी), बजरंग शुक्ला (रा.पारसनाथ कंपाऊंड) हे जखमी झाले. त्यांना मानकोली नाका येथील लोटस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर अल्पेश भोईर (रा. वाडा) यांना ठाणे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे. या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -