घरमुंबईFact Check: काय सांगता! २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन?

Fact Check: काय सांगता! २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन?

Subscribe

पीआयबी फॅक्टचेकमध्ये ही खोटी माहिती असल्याचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या नावे एक परिपत्रक गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. देशात पुन्हा २५ सप्टेंबरपासून लॉकडाऊन सुरू होणार अशी माहिती या परिपत्रकातून व्हायरल झाली होती. मात्र संपुर्ण देशात २५ सप्टेंबरला लॉकडाऊन ही अफवाच असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्पष्ट केले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये ही माहिती स्पष्ट करण्यात आले आहे. पीआयबीने खुलासा करताना नमुद केले आहे की पुन्हा लॉकडाऊन अंमलात आणणार अशा आशयाचा कोणताही आदेश पीआयबीमार्फत जाहीर करण्यात आलेला नाही.

 

- Advertisement -

देशात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन अंमलात आणण्यात येणार आहे. त्यासोबतच भारतात दररोज वाढणाऱ्या ९० हजार कोरोना रूग्णांची संख्या पाहता लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात नमुद केले आहे. पण हे परिपत्रक खोट्या माहितीच्या आधारावर तसेच बनावट असल्याचे पीआयबीने जाहीर केले आहे. त्यामुळे हे परिपत्रक म्हणजे केवळ अफवाच आहे असेही स्पष्ट करण्यात आले. मुळात भारतात मार्च ते जून या कालावधीत अतिशय कडक असा लॉकडाऊन अंमलात आणण्यात आला. पण आता अनलॉकच्या टप्प्यात मात्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना म्हणून अनलॉकिंगच्या टप्प्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. म्हणूनच नागरिकांनी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच एक लस मिळेपर्यंतचा उपाय असल्याचे पीआयबीने दिलेल्या माहितीत नमुद केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -