घरमुंबईठाण्यात प्लास्टीक बंदीचा आदेश पायदळी

ठाण्यात प्लास्टीक बंदीचा आदेश पायदळी

Subscribe

पालिकेची कारवाईची मोहीम थंडावली

प्लास्टीक बंदी विरोधात ठाणे पालिका प्रशासनाने जोरदार कारवाईची मोहीम राबविली. मात्र आता पालिकेची ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे ठाण्यात दुकानदारांकडून सर्रासपणे प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. प्लास्टीक बंदीचा आदेश सर्रासपणे पायदळी तुडविला जात असल्याचे दिसून येते.

ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये प्लास्टीकच्या पिशव्यांचा सर्रासपणे वापर

ठाण्यात बाजारपेठेत दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून बिनधास्तपणे प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. भाजी विक्रेत, फळविक्रेत अथवा मासळी विक्रेत्यांबरोबरच फुल आणि हार विक्रेते यांच्याकडून पिशव्या वापरल्या जात आहेत. दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेने प्लास्टीक विरोधात जोरदार मोहिम राबवली होती. अनेकांकडून दंडही वसूल केला. पथनाटयातूनही जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहनही करण्यात आले.

- Advertisement -

पालिकेकडून आतापर्यंत ८०० किलो प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त 

पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण १५,५४८ किलो प्लस्टिक आणि थर्माकोल वाहनाद्वारे संकलन करण्यात आले आहे. तर ५०४९ किलो प्लस्टिक आणि थर्माकोल आस्थापनाधारकांकडून जप्त करण्यात आले असून दंडापोटी रु.९,४०, २०० एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच सन २०१९-२० या आर्थिक वर्षात आजपर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ८०० किलो प्लास्टिक व थर्माकोल जप्त करण्यात आले असून दंडापोटी १ लाख ३५ हजार रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

‘या’ परिसरात प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर

मात्र, पालिकेची मोहीम थंडावल्यानंतर पुन्हा प्लास्टीक पिशव्यांचा वापर दिसून येतो. ठाण्याचा जांभळी नाका परिसर त्याच्या शेजारील असलेली मुख्य बाजारपेठ महागिरी परिसरातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचा बाजार आणि गोखले रोड किसन नगर आणि वागळे परिसरात आजही सरार्सपणे प्लास्टीक पिशव्या दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे प्लास्टीक बंदीचे उद्दीष्ट सफल झाल्याचे दिसून येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -