घरमुंबईरावणाशी संग केल्यानंतर रामाचे नाव घेण्याचा अधिकार नाही; ठाकरेंच्या आरोपांवर शिंदेंचं जोरदार...

रावणाशी संग केल्यानंतर रामाचे नाव घेण्याचा अधिकार नाही; ठाकरेंच्या आरोपांवर शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : ज्यांनी स्वतःच वैयक्तिक स्वार्थासाठी दहा दिशेला दहा तोंडे असलेल्या इंडी आघाडीच्या रावणासोबत संग केला आहे, त्यांना रामाचे महत्व कसे कळणार..? रामाचे नावही घेण्याचा अधिकार आता त्यांना नाही, अशी जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. तसेच ज्यांची हिट विकेट गेली आहे, त्यांना पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (No right to take the name of Rama after consorting with Ravana Eknath Shinde strong response to Uddhav Thackeray allegations)

हेही वाचा – Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात ‘सामना’; मुख्यमंत्री काय म्हणाले?

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवी आज दादरमधील कासारवाडी भागातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक रहिवाशांच्या सोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून प्रत्येक निर्णय येताना ते आरोपातील तथ्य तपासून त्यानंतरच त्याबद्दल निर्णय देत असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निर्णय दिला तर ते चांगले आणि आपल्या विरुद्ध निर्णय दिला तर ते वाईट असे म्हणून चालत नाही. उद्या मतदारांनी यांना नाकारल्यानंतर हे त्यांच्यावरही आरोप करायला मागेपुढे पाहणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Balasaheb Thackeray : स्मृतीस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने…; ठाकरे-शिंदे वादानंतर राऊतांचे ट्वीट

- Advertisement -

उबाठा गटाकडून हिंदुत्वाला तिलांजली

ज्यांनी स्वतः दहा तोंडी इंडीया आघाडीत जाऊन रावणाशी संग केला आहे, त्यांना रामाचे महत्व कधी कळणार नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अयोध्येत राम मंदिराचं आपलं स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून आनंदच व्यक्त केला असता, मात्र आता उबाठा गटाचे नेते हिंदुत्वाला तिलांजली देऊन इंडीया आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना सगळेच चुकीचे वाटू लागण्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -