घरमुंबईवसई विरारमध्ये मराठी फलक बंधनकारक

वसई विरारमध्ये मराठी फलक बंधनकारक

Subscribe

महापालिकेच्या दुकानदारांना नोटीसा

दुकानांवर मराठी भाषेतील फलक बंधनकारक असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वसई विरार महापालिकेने शहरातील दुकानदारांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या नियमाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियमानुसार केंद्र सरकारच्या 3 भाषा धोरणानुसार राज्यामध्ये इंग्रजी व हिंदी भाषेबरोबर मराठी भाषेचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पत्र राज्य सरकारतर्फे महापालिकेला पाठवण्यात आले असून महापालिकेने त्याची अंमलबजावणी सुुरु केली आहे.

- Advertisement -

वसई-विरार शहरातील दुकानांवर आता इंग्रजी,हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भातील पत्र राज्य सरकारतर्फे महापालिकेला प्राप्त झाले असून, शहरातील दुकानांना नोटीस धाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नियमांचे पालन न करणार्‍या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या नोटीसीनुसार आता शहरातील दुकानांच्या फलकावर इंग्रजी व हिंदी भाषेबरोबर मराठी भाषेचा वापर अनिवार्य असणार आहे. तसेच प्रत्येक फलकावर इतर भाषेच्या आकारापेक्षा मराठी भाषेचा आकार मोठा व तो सुरुवातीस लिहणे आवश्यक असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -