घरमुंबईएनएसयुआयने कुलगुरुंच्या कार्यालयाला ठोकले टाळे

एनएसयुआयने कुलगुरुंच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Subscribe

गांधीविरोधातील व्हिडीओप्रकरणी योगेश सोमन यांनी माफी मागावी

‘आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यायलेला अशी तुझी अवस्था आहे, तुझ्या पप्पूगिरीचा मी जाहीर निषेध करतो कारण सावरकर आडनाव घेण्याची तुझी लायकी नाही’ असे वादग्रस्त विधान केलेला व्हिडीओ मुंबई विद्यापीठाचे अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमन यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अपलोड केला होता. सोमण यांनी गांधी घराण्याची बदनामी केल्याचा आरोप करत नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) मंगळवारी मुंबई विद्यापीठात जोरदार आंदोलन करत कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

माझे नाव राहुल सावरकर नसून, माझे नाव राहुल गांधी असल्याचे सांगत मी माफी मागणार नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका सभेत केले होते. या वक्तव्याचे निषेध करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमन यांनी फेसबूक आणि ट्विटरवर स्वत:चा एक व्हिडीओ अपलोड केला. यात सोमन यांनी ‘तु खरंच सावरकर नाही, त्यांच्यात आणि तुझ्यात काहीच साम्य नाही. त्याग, तेज, तर्क, तळमळ यातले काहीच नाही. खरंतर तु गांधीही नाही कारण त्यांच्यामध्ये आणि तुझ्यात काहीच साम्य नाही. तुला मिळालेल्या गांधी आडनावाचा तु आधी इतिहास जाणून घे, ‘आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यायलेला अशी तुझी अवस्था आहे, तुझ्या पप्पूगिरीचा मी जाहीर निषेध करतो कारण सावरकर .आडनाव घेण्याची तुझी लायकी नाही’ अशी खरमरीत टीका राहुल गांधी यांच्यावर केली होती.

- Advertisement -

सोमन हे मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये एका जबाबदार पदावर असून त्यांच्या या वक्तव्यामुळे गांधी घराण्याची बदनामी झाली आहे. याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. सोमन यांच्या व्हिडीओमुळे मुंबई विद्यापीठाचे नाव बदनाम झाल्याचा दावा एनएसयुआयकडून करण्यात आले. त्यामुळे सोमन यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एनएसयूआयकडून मंगळवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या कार्यालयसमोर सोमन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कुलगुरूंनी पोलिसांना पाचारण केल्याने संतप्त झालेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकले. अखेर एनएसयुआयच्या शिष्टमंडळाला आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी कुलगुरुच्या कार्यालयाचे दरवाजे उघडण्यात आले.

आरएसएसचे एजंट योगेश सोमन याला मुंबई विद्यापीठात राजकारण करायचे असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राहुल गांधी आणि हुतात्मा इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही. कुलगुरूंनी योगेश सोमन याच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. विद्यापीठाने निलंबनाची कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू.
– निखिल कांबळे, राष्ट्रीय सचिव, एनएसयूआई, प्रभारी दिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -