घरमुंबईकन्यारत्न झाल्यास मोफत प्रसुती; कल्याणमधील डॉ. राजन वैद्य यांचा अभिनव उपक्रम

कन्यारत्न झाल्यास मोफत प्रसुती; कल्याणमधील डॉ. राजन वैद्य यांचा अभिनव उपक्रम

Subscribe

`बेटी बचाओ, बेटी पढाओ' या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणमधील डॉक्टर राजन वैद्य यांनी स्तुत्य उपक्रम आणला आहे.

`बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणच्या डॉ. राजन वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार त्यांच्या व्यंकटेश रुग्णालयात यापुढे स्त्री अर्भकाचा जन्म झाल्यास प्रसुती किंवा सिझेरियन मोफत केले जाणार आहे.

‘स्व. मिनाताई ठाकरे स्वागत योजना’

कल्याणमधील ख्यातनाम डॉ. राजन वैद्य यांनी पुढाकार घेत `बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चळवळीला मूर्त स्वरुप दिले आहे. त्यांच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींची मोफत प्रसुती केली जाणार आहे. ठाकरे परिवाराशी ऋणानुंबध असल्याने आपण ‘स्व. सौ. मिनाताई ठाकरे कन्यारत्न स्वागत योजना’ ही योजना सुरु करीत आहे. या योजनेचा आरंभ शुक्रवारी दि. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता कल्याणच्या श्री साई हॉल, वायले नगर, खडकपाडा येथे होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रमाधाम वृध्दाश्रमाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, महापौर विनिता राणे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. या आगळयावेगळया समारोहास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजन वैद्य यांनी केले आहे.

- Advertisement -

नर्सिंग सेवा मोफत

डॉक्टर राजन वैद्य यांच्या पुढाकाराने स्वर्गीय मिनाताई ठाकरे स्वागत योजनेद्वारे कन्यारत्नाचे स्वागत केले जाणार आहे. स्त्री अर्भकाचा जन्म झाल्यास प्रसुती किंवा सिझेरियनचा कोणताही खर्च घेतला जाणार नाही. तीन ते पाच दिवस रुग्णालय व नर्सिंग सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. रुग्णाला औषधे व अन्य खर्च करावा लागणार आहे. ही योजना फक्त जनरल वॉर्डसाठी राखीव असून त्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही.

डॉ. राजन वैद्य यांचे कार्य

डॉ. राजन वैद्य हे निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असून त्यांची दोन्ही मुले अमेरिकेतील नावाजलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर म्हणून काम करीत आहेत. गेली ३० वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करीत असतांना डॉ. राजन वैद्य यांनी टेस्टट्युब बेबीसारखी खर्चिक उपचारपद्धती मुंबई महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात माफक दरात सुरु केली. स्त्री जन्मदर वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उदेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -