घरमुंबईआता प्रदेशाध्यक्ष पदासाठी 'दादां'चे नाव चर्चेत

आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘दादां’चे नाव चर्चेत

Subscribe

याआधी गिरीष महाजन, पंकजा मुंडे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा होती. मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोण? अशी चर्चा रंगलेली असताना आता आणखी एका नावाची चर्चा प्रदेशाध्यक्ष पदासाठी होऊ लागली असून, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद देण्याचा विचार करण्यात येत आहे. याआधी गिरीष महाजन, पंकजा मुंडे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा होती. मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा –

चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांच्या सर्वात जवळचे असल्याने तसेच ते मराठा समाजाचे नेतृत्व करत असल्याने मराठा चेहरा पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी द्यावा अशी भाजपाच्या बैठकीत चर्चा असून, त्यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी विचारणा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या मराठा समाज आक्रमक असून, प्रदेशाध्यक्षपदी मराठा समाजाच्या नेत्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

‘दादा’ मात्र इच्छुक नाहीत –

दरम्यान एकीकडे पक्षश्रेष्ठींकडून जरी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी चंद्रकांत पाटील हे मात्र इच्छुक नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे सघ्या मराठा समजाच्या उपसमितीचे अध्यक्ष पद असून,ते सोडून प्रदेशाध्यक्ष पद स्विकारने शक्य नसल्यानेच चंद्रकांत पाटील यांच्याकडून नकार दिल्याचे बोलले जात आहे.

म्हणून प्रदेशाध्यक्ष पद बदलाच्या हालचाली –

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा खासदार झाल्यामुळे तसेच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असून, आगमी विधान सभा निवडणुका लक्षात घेता दानवेंच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष देऊन त्याच्यावर पक्षाची जबाबदारी देण्याचा विचार भाजपामध्ये सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -