घरमुंबईमुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या नवीन ८ शिवनेरी

मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या नवीन ८ शिवनेरी

Subscribe

३८ फेर्‍यांमध्ये वाढ

एसटी महामंडळाने शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात केल्यानंतर मिळणारा प्रवासी प्रतिसाद लक्षात घेऊन एसटीने पुन्हा मुंबई-पुणे महामार्गावर नवीन २० शिवनेरी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ८ बसेस मुंबई-पुणे मार्गावर शुक्रवार पासून चालवण्यास सुरुवात झाली असून यामुळे या मार्गावर तब्बल ३२ नव्या फेर्‍यांची भर पडली आहे.
गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर एसटीची शिवनेरी ही बससेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देत आहे. सध्या मुंबई-पुणे मार्गावर दिवसभरात २७२ फेर्‍या सुरु असून त्यामध्ये आजपासून सुरु झालेल्या ३२ फेर्‍यांची वाढ झाली आहे.

यामुळे दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट अशा विविध मार्गावर शुक्रवार पासून ३०४ फेर्‍या दररोज चालणार आहेत. त्याचा फायदा या सेवेचा लाभ घेणार्‍या असंख्य प्रवाशांना होणार आहे. गेल्या महिनाभरामध्ये तिकीट दरात कपात केल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत एका महिन्यात अंदाजे २१ हजार प्रवाशांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शिवनेरीमध्ये महिला प्रवाशांसाठी ३ ते १२ अशी दहा आसने आरक्षित आहेत. साहजिकच सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी महिला प्रवाशांची पहिली पसंती हि शिवनेरी आहे वाढलेल्या फेर्‍या व कमी झालेले तिकीट दर याचा जास्तीत-जास्त फायदा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -