घरमुंबईवाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचन ध्यासा’चे आदेश

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचन ध्यासा’चे आदेश

Subscribe

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त उपक्रम

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कामकाजाच्या वेळेत एकत्रित बसून सलग काही तास ‘वाचन ध्यास’ म्हणून व्यतीत करावा, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा’ चळवळ म्हणून पुढे यावा यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यामध्ये ‘एक व्यक्ती एक पुस्तक भेट’ हा उपक्रम राबवला जावा. प्रत्येक व्यक्ती किंवा शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप असतील अशी पुस्तके भेट द्यावी, शाळांमध्ये ‘वाचू आनंदे’ तासिका राबवण्यात यावी, कलामांच्या पुस्तकावर व्याख्याने, लेखक व कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आंमत्रित करणे, पुस्तक प्रदर्शन, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनाने घडलेले संस्कार याविषयी माहिती देणे व विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे असे विविध उपक्रम राबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -