घरमुंबईसाकिनाका येथे टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्सच्या भागीदाराची आत्महत्या

साकिनाका येथे टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्सच्या भागीदाराची आत्महत्या

Subscribe

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 45 वर्षीय प्रेयसीला अटक

साकिनाका येथे एका टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्स कंपनीत भागीदार असलेल्या योगेश कांबळे याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्याची भागीदार असलेली 45 वर्षीय प्रेयसी नीता चंद्रकांत गवळी हिला सोमवारी अटक केली. अटकेनंतर तिला सोमवारी सायंकाळी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

योगेश कांबळे हा साकिनाका परिसरात पत्नी आणि दोन मुलीसोबत राहत होता. गेल्यावर्षी त्याने नीता गवळी हिच्यासोबत भागीदारीत टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय सुरु केला होता. नीता हीदेखील विवाहीत असून तिला 21 वर्षांचा एक मुलगा आणि दोन मुली आहेत. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना ती त्याला लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र योगेश हा विवाहीत असल्याने तो तिच्याशी विवाह करण्यास नकार देत होता. अलीकडेच त्याच्या पत्नीला या दोघांच्या अनैतिक संबंधाची माहिती समजली होती. काही दिवसांपूर्वी निताने त्याच्या घरी दोन भाडोत्री गुंडांना पाठविले होते.

- Advertisement -

योगेशने तिच्याशी विवाह करावा यासाठी ती दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होती. इतकेच नव्हे तर तिने पत्नीसमोरच योगेश कांबळे याला बेदम मारहाणही केली होती. या कारणामुळे योगेश हा काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. 13 ऑक्टोबरला त्याने नीताची कार एमसीजीएम मार्केटजवळील एका इमारतीजवळ पार्क केली होती. रात्री तीनपासून तो कारमध्येच होता. सकाळी साडेसात वाजता त्याने कारमधून पेट्रोल काढले, ते पेट्रोल अंगावर ओतून त्याने पेटवून घेतले होते. त्यात तो 70 टक्के भाजला होता. त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर योगेशची पत्नी राणी कांबळे हिने साकिनाका पोलिसांत नीता गवळीविरुद्ध तक्रार केली होती. पत्नी आणि मुलांना सोडून लग्नासाठी दबाव आणणे, भाडोत्री गुंड पाठवून धमकाविल्याचा आरोप तिने आपल्या तक्रार अर्जात आरोप केला होता. या आरोपांची शहानिशा केल्यानंतर साकिनाका पोलिसांनी नीता गवळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला याच गुन्ह्यांत सोमवारी पोलिसांनी अटक केली. सध्या ती पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -