घरमुंबईठाण्यातील हाजुरी ग्रामस्थांचा क्लस्टर योजनेला विरोध

ठाण्यातील हाजुरी ग्रामस्थांचा क्लस्टर योजनेला विरोध

Subscribe

हाजूरी परिसरातील रहिवासी व भूमिपुत्रांनी क्लस्टर योजनेला प्रखर विरोध दर्शविला. गुरुवारी ठाणे महापालिकेत क्लस्टर योजनेच्या हरकती व सूचनांवर नौपाडा प्रभाग समितीत सुनावणी पार पडली. त्यावेळी क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केला. हाजुरी हा गावठाण असल्याने क्लस्टर योजना लागू होत नसल्याचे म्हणणे रहिवाशांच्या वतीने मांडण्यात आले. त्यामुळे हाजुरीत क्लस्टर योजना वादात अडकण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेकडून हाजूरी येथील यू आर पी क्र 11 मध्ये नागरी समूह विकास योजना ( क्लस्टर डेव्हलपमेंट ) राबविण्यात येणार आहे. क्लस्टर योजनेला स्थानिक रहिवाशांनी हरकत घेऊन विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांच्या हरकतीवर उपायुक्त एामप्रकाश दिवटे यांनी नौपाडा प्रभाग समितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी हाजुरी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुनावणीसाठी गिरीष साळगांवकर, गिरीश पाटील व इतर यांच्यावतीने 61 जणांच्या स्वाक्षरी असलेले पत्र सादर करण्यात आले. क्लस्टर योजनेतून गावठाण व कोळी वाडे वगळण्यात आलेले आहे. हाजुरी एक गावठाण आहे. त्यामुळे यासाठी क्लस्टर योजना लागू होऊ शकत नाही. ठाण्यातील कोणत्याही गावठाण, कोळीवाडा, पाडे यांचे सीमांकन व विस्तारित सीमांकन झाले नाही.

- Advertisement -

कोळीवाडे व गावठाण क्लस्टर योजनेतून वगळण्यात आली आहेत. मग हजुरी गावठाण का वगळण्यात आले नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच कोळीवाडा व गावठाण साठी नवीन डीसीआर बनविण्यात यावे, यासाठी गावठाण, कोळीवाडे, पाडे संवर्धन समिती तर्फे शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. मुंबईतील गावठाण कोळीवाड्यांचे विस्तारित सीमांकानाचे काम सुरू असून, ते पूर्ण होताच ठाणे तसेच इतर सागरी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू होईल असे आश्वासन शासनकर्त्या कडून मिळालेले आहे. कोळीवाडे गावठाण हे स्वतःचा विकास स्वतः करणार आहेत, स्वयं विकास योजना राबविणार आहेत. आम्हाला क्लस्टर योजना, एसआरए या सारख्या योजनांची आवश्यकता नाही, अशी बाजू हाजुरी रहिवाशांच्यावतीने मांडण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -