घरमुंबईम्हाडावासीयांची थकबाकी ३४३ कोटी रूपयांवर

म्हाडावासीयांची थकबाकी ३४३ कोटी रूपयांवर

Subscribe

मुंबई म्हाडाच्या वसाहतीतील भाडेवसुलीची थकबाकी ३४३ कोटी रूपये इतकी आहे. येत्या डिसेंबर अखेरीपर्यंत १०० कोटी रूपयांची थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न करावेत असे आदेश मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी अधिकारी आणि भाडेवसुलीकारांना दिले आहेत. मुंबई मंडळाच्या वसाहतीतील भाडेवसुली आणि थकबाकी संदर्भात नुकतीच अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. भाडेवसुलीतील दिरंगाईनंतर अधिकार्‍यांना डिसेंबर अखेरची डेडलाईन देण्यात आली आहे. अधिकारी वर्गाने भाडेवसुली गांभिर्याने घेतलेली नाही.

अपेक्षित वसुली किती आणि जुन्या दराने किती वसुली करण्यात आली याचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत. पुढील बैठकीत भाडेवसुलीचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. थकबाकी वसुल न झाल्यास गाळेधारकांचा बेजबाबदारपणा वाढेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. लेखापरीक्षणामध्ये म्हाडाकडून भाडेवसुलीसाठी आवश्यक प्रयत्न न झाल्याबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केले जाईल, असेही चव्हाण म्हणाले. भाडेवसुलीकार यांच्याकडून अधिकाधिक वसुलीसाठी फिल्डबुक अद्ययावत करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -
चार वर्षांत अहवालच नाही

मुंबई म्हाडाच्या अधिकार्‍यांनी २०१४ सालापासून वार्षिक प्रशासकीय अहवाल सादर केलेला नाही, याबाबतही मधु चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अहवाल सादर न करणे ही गंभीर आणि अक्षम्य बाब आहे. वार्षिक प्रशासकीय अहवाल सादर करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.

थकबाकी असलेल्या वसाहती

सायन- धारावी
पोलीस विभागाकडून रक्कम वसुली प्रलंबित असून जवळपास ५० लाख रक्कम इमारत दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण गाळ्याची भाडेवसुली बाकी आहे.

- Advertisement -

कुर्ला – चेंबूर
संबंधित विभागाचे लोकप्रतिनिधीनी कुर्ला-चेंबूर येथील काही इमारतींच्या वसुली वाढीव दराने वसुली करू नये अशी मागणी केली आहे.

बोरिवली
समतानगर या वसाहतीमधील सुमारे १८ ते २० कोटी

महावीर नगर, कांदिवली
पाण्याच्या पाईपलाईन व पाण्याचेदेयक देण्याबाबत वाद आहेत

गोरेगाव
सिध्दार्थनगर, शास्त्रीनगर येथील प्रत्येक संस्थेकडून ७४ लाख ते ७८ लाख रक्कम शिल्लक पाण्याची देयकाची २७ कोटी रक्कम शिल्लक असून प्रत्येक सोसायटीला नोटीस देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -