घरमुंबईविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण तडीपार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण तडीपार

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उल्हासनगर पोलीस परिमंडळ 4 च्या क्षेत्रातील काही गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक टीओके पक्षाच्या युवक अध्यक्ष सुंदर मुदलियार यांच्यासह 10 जणांना समावेश आहे.

उल्हासनगर परिमंडळमध्ये आठ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चार विधानसभा क्षेत्र येतात. लोकसभा निवडणुका भयमुक्त करण्यासाठी परिमंडळ 4 चे उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे, तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुनील पाटील यांनी विविध पोलिस ठाण्यातील दोन डझन गुन्हेगार तडीपार केले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तडीपारीची कारवाई पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्याकडे सहाय्यक आयुक्त धुला टेळे, विनायक नरले यांनी विविध पोलीस ठाण्यातील गुन्हेगार तडीपार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
आतापर्यंत उल्हासनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील 10, मध्यवर्ती पोलीस ठाणे क्षेत्रातील 14, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे क्षेत्रातील 4 , हिललाईन पोलीस ठाणे क्षेत्रातील 16, अंबरनाथ पोलीस ठाणे क्षेत्रातील 10, शिवाजीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील 3, बदलापूर पूर्व पोलीस ठाणे क्षेत्रातील 1 आणि बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे क्षेत्रातील 6 असे आतापर्यंत एकूण 64 जणांना तडीपार करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात त्यापैकी नऊ जणांना तडीपार करण्यात आले आहे.

- Advertisement -

मध्यवर्ती पोलीस ठाण्यातून सुंदर मुदलियार, आयप्पा मुदलियार, बालाजी मुदलियार, कार्तिक द्रविड, विकी रणदिवे तर अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अजित गायकवाड, सुजित गायकवाड, सुनील गायकवाड, प्रसाद गायकवाड यांना एका वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी सांगितले. तसेच आणखीन 30 प्रकरणे ही चौकशीत असून लवकरच आणखी काही आरोपी तडीपार होणार असल्याचे पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयातून समजले. ऐन निवडणूकच्या पार्श्वभूमीवर टीओके ( टीम ओमी कलानी ) पक्षाचा युवक अध्यक्ष सुंदर मुदलियार याला पोलिसांनी तडीपार केल्यामुळे या पक्षात चिंतेचे वातावरण आहे. टीओके बरोबरच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तडीपार होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -