घरमुंबईमास्क जादा दराने विकणाऱ्यांवर कारवाई करणार

मास्क जादा दराने विकणाऱ्यांवर कारवाई करणार

Subscribe

जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचा इशारा , मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार,जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरूच

पालघर जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असताना पालघरमध्ये मास्क आणि सॅनिटायझरची जादा दराने विक्री होत असल्याची लेखी तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी पालघर जिल्ह्यातील पालघर, मनोर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वसई, नालासोपारा येथे आठवडे बाजार सर्रासपणे भरवला जात आहे. याबाबत मात्र जिल्हा प्रशासन कारवाई करण्यात सक्षम नसल्याचे समोर आले आहे. तहसीलदार कार्यालय स्थानिक पातळीवर भरणार्‍या आठवडे बाजार विषयी संवेदनशील नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शाळा पालघर जिल्हा मुंबई शहराजवळ असल्यामुळे अनेक पर्यटक पालघर जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या ग्राहकांकडून मास्क विक्री करणारे मेडिकल स्टोर्सकडून जादा दराने विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने मास्क आणि सॅनिटायझरची मागणी पालघरमध्ये वाढू लागली आहे. मागणीपेक्षा साठा कमी असल्याने मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई करण्याचे सूचना संबधित विभागाला दिल्या आहेत. सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले. अंगणवाडीमध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डिंग लावण्यात आले आहेत. चित्रपटगृह, केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी गर्दी टाळावी- -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक असे कोणतेही समारंभ आणि आठवडे बाजार नागरिकांनी आयोजित करू नये तसेच अशा कार्यक्रमाना गर्दी करू नये. करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाने घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -