घरमुंबईपालघर : जोरदार वाऱ्यासह पडलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान

पालघर : जोरदार वाऱ्यासह पडलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान

Subscribe

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिके तयार झाल्याने शेतकरीवर्गाने भात पीक कापणीला कामाला सुरुवात केली असताना परतीच्या पावसाने भात पीकाचे नुकसान केले आहेत तर काही भागात झाडे पडली आहेत. पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाची सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.वाडा तालुक्यातील सोनाळे भागात जोरदार वाऱ्याने मोठे वृक्ष ही रस्त्यावर पडले आहेत.त्यामुळे खर्डी वाडा या रस्त्याच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पिके आडवी केली आहेत. तर तलासरी डहाणू भागात पावसाने नुकसान केले आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात ७५ हजार ६७७ हेक्टर क्षेत्र भात पीक लागवडी खाली आहे.यात वाडा तालुक्यातील १४ हजार ०१९ हेक्टरी क्षेत्र भात पिकाखाली आहे. वसई ७ हजार ३९१ हेक्टर, डहाणू १५ हजार २१९ हेक्टर, पालघर १३ हजार ९३२, विक्रमगड ७ हजार १३१ हेक्टर, जव्हार ६ हजार ५०५ हेक्टर क्षेत्र आणि २ हजार ०६५ हेक्टर क्षेत्र भात पीक लागवडी खाली आहे. कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने भात कापणी कामाला सुरुवात केली होती. या अगोदर परतीच्या पावसाने तयार झालेली भातपीक आडवी केली होती. आशाही परिस्थितीत शेतकरी चार पाच दिवस पावसाने उघडीप दिल्याने कापणी कामे लगबगीने हाती घेतली होती. जिल्ह्यात झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावत इथल्या भात शेतीचे नुकसान केले आहे.

गणपती उत्सवानंतर काही प्रमाणात थांबलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरूवात केली. हा परतीचा पाऊस असून गेल्या दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरी भागात जागोजागी पाणी साचले असून पालघर जिह्ल्यातील वाडा, डहाणू परिसरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

महत्त्वाची बातमी! देशात कोरोनाची लस कधी येणार; आज होणार खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -