घरCORONA UPDATEमहत्त्वाची बातमी! देशात कोरोनाची लस कधी येणार; आज होणार खुलासा

महत्त्वाची बातमी! देशात कोरोनाची लस कधी येणार; आज होणार खुलासा

Subscribe

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता यावरील लस कधी येणार, याची वाट सगळे पाहत आहेत. कोरोनाच्या लशीत रशियाने पहिला क्रमांक लावला असला तरीही सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉनन्स या तीन कंपन्यांकडूनही सर्वांना अपेक्षा आहेत. याच लसीसंबंधीत महत्त्वाची माहिती आज समोर येणार आहे. भारतात ही लस कधी उपलब्ध होणार आणि सर्वात आधी कुणाला मिळणार यासंदर्भात अधिकृतपणे आज, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन माहिती देणार आहेत.

- Advertisement -

भारत रशियाच्या लशीच्या उत्पादनाबाबत उत्सुक आहे त्या कराराबाबत काय होणार? याशिवाय भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूटने तयार केलेल्या लशीसंदर्भातही ते माहिती देणार आहेत. ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. त्यामुळे या लशी प्रत्यक्षा येण्यासाठी आणखीन किती कालावधी लागेल आणि काय नियोजन असेल यासंदर्भात आज डॉक्टर हर्षवर्धन माहिती देणार आहेत.

हेही वाचा –

देशात ९ लाख ३७ हजार ६२५ active रुग्ण; एका दिवसात ९४० जणांचा मृत्यू  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -