घरताज्या घडामोडीपंकजा मुंडे दिल्लीत, चर्चांना उधाण

पंकजा मुंडे दिल्लीत, चर्चांना उधाण

Subscribe

पंकजा मुंडेंना दिल्ली हायकमांडनी दिल्लीत बोलावल्याने या भेटीमागचं गौडबंगाल काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे. काय असतील या भेटीमागचे कारणे.

केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे जरी सांगितले असंल तरी त्यांची नाराजी लपून राहीलेली नाही. पंकजा यांच्या स्पष्टीकरणानंतरही बीड व अहमदनगरमधील पाथर्डी येथील भाजपमधील मुंडे समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं आहे. याचदरम्यान पंकजा मुंडेंना दिल्ली हायकमांडनी दिल्लीत बोलावल्याने या भेटीमागचं गौडबंगाल काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे. काय असतील या भेटीमागचे कारणे.

पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे संघटनेच्या कामासंदर्भात हा दौरा असण्याची कारणे नाकारता येणार नाहीत. त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळण्याच्या मुद्दयावरही पंकजा जेपी नड्डा यांच्याशी बोलू शकतात. पंकजा या आक्रमक व स्पष्टवक्त्या आहेत. भाजपासाठी मुंडे कुटुंबीयांनी केलेल्या योगदानावरही त्या पत्रकार परिषदेत बोलल्या होत्या. त्यामुळे याच मुद्यावरील नाराजगी त्या हायकमांडपुढे व्यक्त करू शकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपमध्ये कुरबुर करणाऱ्या नेत्याची दखल घेतली जात नाही असे भाजपचेच नेते सांगत आहेत. यामुळे पंकजा यांच्या केंद्रीय मंत्रिमडळ विस्तारावरील नाराजगी ऐकण्यात व त्यांना त्यावर स्पष्टीकरण देण्यात जेपी नड्डा रस दाखवण्याची शक्यताही दुर्मिळ आहे.

तर सध्या मुंडे भगिनीच्या नाराजीनंतर भाजपच्या मुंडे समर्थकांनी ज्या प्रकारे वेगाने राजीनामा सत्र सुरू केले आहे त्याचा फटका नक्कीच पक्षाल बसू शकतो याची हायकमांडला जाण आहे. यामुळे जेपी नड्डा पंकजा यांचे म्हणणे ऐकण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -