घरमुंबईपनवेल उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये डासांची पैदास

पनवेल उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये डासांची पैदास

Subscribe

रुग्णांच्या नातेवाईकांनाही डेंग्यूची लागण

पनवेल उपजिल्हा रुग्णालय उभारल्यानंतर रुग्णांच्या सोयीसुविधांचा प्रश्न कायम आहे. पनवेलमध्ये डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता असतानाच दस्तुरखुद्द उपजिल्हा हॉस्पिटलच्या बांधकामासाठी बनविण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीमध्येच डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्यामुळे याचठिकाणी डासांची पैदास झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पनवेलच्या उपजिल्हा हॉस्पिटलचे बांधकाम, बांधकाम खात्याकडून तब्बल आठ वर्षे रखडत ठेवले गेले. नंतर इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीला अवघ्या एका महिन्यातच गळती लागल्यामुळे या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याठिकाणी झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आठ वर्षांपूर्वी या ठिकाणी इमारतीच्या बांधकामासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही काम झाल्यानंतर काढण्यात न आल्यामुळे या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्या आहेत.

- Advertisement -

यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूलाच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ‘आम्ही आमच्या वतीने त्याची स्वच्छता करणार आहोत’असे आश्वासन देण्यात आले.

याच ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामावेळी उरलेले डेब्रिज तसेच थर्माकोल आणि इतर कचरा हा टाकण्यात आल्याने याठिकाणी परिसर विद्रुप करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने केलेले आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -