घरमुंबईएसटी हायटेक होण्यासाठी उजाडणार 2020

एसटी हायटेक होण्यासाठी उजाडणार 2020

Subscribe

फक्त 4 हजार बसेसला व्हीटीएस यंत्रणा

ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटी बसगाडी डिसेंबर 2019 अखेरपर्यंत हायटेक होणार होती. मात्र अद्यापही राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार 500 गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) बसविने शक्य झाले नाही. फक्त 4 हजार बस गाड्यांना व्हीटीएस बसविण्यात आले आहे.

14 हजार 500 बस गाड्या बाकी असून याला 2020 उजाडणार आहे. मात्र, उर्वरित बस गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्याचे काम युध्दपातळीवर एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. मार्च 2020 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीटीएस यंत्रणा कार्यान्वित करत आहे. या यंत्रणामुळे बसवल्यानंतर प्रवाशांना संबंधित एसटी कोणत्या भागातून धावत आहे. तिचे शेवटचे लोकेशन काय होते. संबंधित बस स्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे. तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजावी, अपघात झाल्यास घटनास्थळी तत्काळ मदत पोहोचवता यावी, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याचे कंत्राट एका बलाढ्य कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प नाशिक भागात प्रायोगिक स्तरावर सुरू केला होता. तो यशस्वीसुध्दा झाला आहे. राज्यभरात 18 हजार 500 एसटीच्या बसेस आहे.

या सर्व बस गाड्यांना डिसेंबर 2019 पर्यंत व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात येणार होती. मात्र आतापर्यत फक्त 4 हजार एसटी बस गाड्यांनाही यंत्रणा बसविण्यात आली आहे. उर्वरित 14 हजार 500 एसटीच्या बस गाड्यांना व्हीटीएस यंत्रणा लावणे सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्हीटीएस यंत्रणा बसविताना कंपनीला पूर्वी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे व्हीटीएस यंत्रणाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आता या तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे व्हीटीएस यंत्रणा एसटीच्या बस गाड्यांना बसविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. लकवरच येत्या दोन तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकारी यांनी दै. आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

मार्च 2020 पर्यंत पूर्ण होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी महामंडळ एक अ‍ॅपही विकसित केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना एका क्लिकवर त्यांना त्यांच्या गाडीचे ठिकाण मोबाईलवर समजू शकणार आहे. मात्र त्यासाठीही व्हीटीएस यंत्रणा खूप महत्वाची आहे. त्यामुळे आता व्हीटीएस यंत्रणा लवकरात लवकर बसविण्यात भर देत आहे. त्यासाठी उर्वरित 14 हजार 500 एसटीच्या बस गाड्यांना व्हीटीएस बसविण्यासाठी रात्र दिवस काम सुरु आहे. मार्च 2020 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्वच बस गाड्यांना व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -