घरमुंबईपार्टी कल्चरमुळे वाढतोय हृदयरोग

पार्टी कल्चरमुळे वाढतोय हृदयरोग

Subscribe

सततच्या मानसिक तणावामुळे हल्ली पार्टी कल्चरमध्ये वाढ झाली आहे. पण, याच वाढत्या सवयींमुळे मुंबईकरांमध्ये हृदयविकार वाढत आहे.

सततच्या मानसिक तणावामुळे हल्ली पार्टी कल्चरमध्ये वाढ झाली आहे. पण, याच वाढत्या सवयींमुळे मुंबईकरांमध्ये हृदयविकार वाढत असल्याचे निरीक्षण बोरिवलीतील अपेक्स हॉस्पिटल समूहाकडून करण्यात आले. या निरीक्षणात आपला मृत्यू हृदयविकारांमुळे होईल, अशी भीती मुंबईकरांना सतावत असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये पाचशेहुन अधिक मुंबईकरांशी संपर्क साधल्यावर हा सर्वे तयार करण्यात आला आहे.

व्यायामाचा अभाव, कामाच्या वाढीव वेळा, जंक फूडची लागलेली सवय आणि मानसिक तणाव घालवण्यासाठी पार्टीज केल्या जातात, अशा अनेक बाबी या सर्वेक्षणामध्ये दिसून आल्या. आपला मृत्यू हा हृदयविकारामुळे होईल, अशी सततची चिंता बहुसंख्य मुंबईकरांना सतावत आहे.

- Advertisement -

मुंबईतील मालाड, बोरिवली, दहिसर आणि मीरा रोड या उपनगरातील विविध परिसरातील ३० ते ६० वयोगटांतील व्यक्तींना घेऊन हे सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणात तंबाखू आणि दारूचे व्यसन हा महत्त्वाचा मुद्दा समोर आला असून प्रत्येक वर्गातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचं आढळलं.

– डॉ. व्रजेश शहा, संचालक, अपेक्स हॉस्पिटल समूह

- Advertisement -

रात्री दारूच्या पार्ट्या, वीकेंडचे ऑउटिंग, काम संपल्यावर हॉटेलिंग, बदलती खाद्य संस्कृती स्वीकारून आपण नकळतपणे हृदयविकाराला आमंत्रण देत आहोत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या नागरिकांमध्ये मद्यपान म्हणजेच अल्कोहोल अब्युज किंवा दारुचं व्यसन हा आजार जडतो आणि फक्त २० टक्के नागरिक या आजारातून बाहेर पडतात, असं ही डॉ.शहा यांनी सांगितलं.

आरोग्य संघटनेचा अहवाल 

जागतिक आरोग्य संघटना दि लॅन्सेटच्या वैद्यकीय अहवालानुसार, भारतामध्ये होणाऱ्या दर शंभर मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे हृदयविकाराने होतात. १९९० साली हृदयविकारामुळे भारतामध्ये १३ लाख लोकांचा मृत्यू हृद्यविकार आणि संबंधित आजारांमुळे झालं होता. २०१६ साली ही संख्या वाढून २८ लाख झाली आहे. १९९० मध्ये २ करोड ५७ लाख हृदयरोगी भारतात होते आणि २०१६ साली ही संख्या वाढून ५ करोड ४५ लाख इतकी झाली असून २०२० साली ही संख्या ७ करोड असेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -