घरमुंबई56 लाख रुपयांच्या गोल्ड बारसह प्रवाशाला अटक

56 लाख रुपयांच्या गोल्ड बारसह प्रवाशाला अटक

Subscribe

मुंबई:बँकाँकहून तस्करीमार्गे आणलेल्या गोल्ड बारसह एका प्रवाशाला बुधवारी हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. मजहर मोईन खान असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्याकडून या अधिकार्‍यांनी दोन किलो गोल्ड बार जप्त केले असून त्याची किंमत 56 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

गोल्ड बार तस्करी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मजहर खान हा बुधवारी बँकाँकहून एअर इंडियाच्या विमानातून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. ग्रीन चॅनेलवरुन तो विमानतळाबाहेर जाण्याचा तयारीत असतानाच त्याला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांनी प्रत्येकी एक किलो वजनाचे दोन गोल्ड बार सापडले.

- Advertisement -

दोन किलो वजनाच्या या गोल्ड बारची किंमत सुमारे 56 लाख रुपये आहे. ते गोल्ड बार नंतर या अधिकार्‍यांनी जप्त केले. याच गुन्ह्यांत नंतर त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली. मजहरने यापूर्वीही गोल्ड बारची तस्करी केली होती का याचा आता तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -