घरमुंबईपालिकेचा मोठा निर्णय, मुंबई विमानतळावर आता RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

पालिकेचा मोठा निर्णय, मुंबई विमानतळावर आता RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होत आहे. यातच सोमवारी राज्यात एकूण १५ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील घट जाणारी रुग्णसंख्या पाहता आता लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता आणली जात आहे. यातच मुंबई विमानतळावरील होणाऱ्या RT-PCR चाचण्यांमधूनही प्रवाशांनी काहीशी सूट देण्यात आली आहे.

यानुसार आता मुंबई विमानतळावर जाणाऱ्या होणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी करणे बंधनकारक नसणार आहे. असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला RT-PCR चाचणी करणे बंधनकारक होते. परंतु आता RT-PCR चाचणीसाठी कोणत्याही प्रवाशाला जबरदस्ती करु नये अशा सुचना पालिकेने दिल्या आहे. तसेच मुंबईतून महाराष्ट्रात कुठल्याही राज्यात प्रवास करताना या RT-PCR चाचणीची गरज भासणार नाही.

- Advertisement -

CBSE-ICSE Board Exam: बारावी परीक्षांचे निर्णय देण्याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्री AIIMS रुग्णालयात दाखल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -