घरमुंबईमुंबई विद्यापीठात पासिंग रॅकेटचा पर्दाफाश; उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार!

मुंबई विद्यापीठात पासिंग रॅकेटचा पर्दाफाश; उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार!

Subscribe

मुंबई विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा पासिंग रॅकेट कार्यरत असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

मुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिकेचे रॅकेट उघड झाले असतानाच आता विद्यापीठात पुन्हा एकदा पासिंग रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये हे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा प्रकार समोर आला असून विद्यार्थ्यांना पास करुन देण्यासाठी हे फेरफार केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या मुंबई विद्यापीठासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे.

तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत येणार्‍या गरवारे इन्स्टिट्यूट मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत फेरफार करणार्‍या तीन आरोपींना सोमवारी बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन अशा तिघांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने शुक्रवार १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गरवारे इन्स्टिट्यूट मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येत असून त्यांच्या माध्यमातून मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट हा विषय आहे. या विषयाची परीक्षा घेतल्यानंतर त्याच्या उत्तरपत्रिका सीलबंद करुन मुंबई विद्यापीठात सुरक्षित ठेवल्या जातात.

- Advertisement -

सीसीटीव्हीने केला पर्दाफाश!

सोमवारी उत्तरपत्रिका ठेवलेले कपाट उघडून त्यातील काही उत्तरपत्रिका काढण्यात आल्याचं समोर आलं. त्यातील काही उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचंही तिथल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे या अधिकार्‍यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संबंधित कार्यालयात कोण कोण आले होते याची शहानिशा करण्यात आली. या फुटेजमध्ये संदीप पालकर आणि संगमेश कांबळे हे जाताना दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याची कबुली दिली. त्यांच्या जबानीतून सय्यद नदीम यानेच त्यांना उत्तरपत्रिका काढून दिल्याचे सांगितले. त्यानंतर या अधिकार्‍यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांच्याविरुद्ध भादंवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.


तुम्ही हे वाचलंत का? – मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणात किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे? ते फेरफार कोणाच्या सांगण्यावरुन झाले होते? त्यात इतर कोणी आरोपी सहभागी आहेत का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – मुंबई विद्यापीठात पीएफ घोटाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -