घरमहाराष्ट्र'सत्यमेव जयते ४'मधून उलगडणार #MeeTooचे सत्य

‘सत्यमेव जयते ४’मधून उलगडणार #MeeTooचे सत्य

Subscribe

सत्यमेव जयतेचा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. #MeToo मोहिमेविषयी चर्चा या कार्यक्रमामध्ये होणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये #MeeToo मोहिम गाजत आहे. या मोहिमेतून अनेक मोठमोठ्या कलाकारांची, दिग्दर्शकांची नावे यातून पुढे आली. याच मोहिमेला धरुन अभिनेता अमिर खान लवकरच आपला गाजलेला कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’ ची सुरूवात करणार आहे. जानेवरीमध्ये ‘सत्यमेव जयते’ च्या चौथ्या सिझनला सुरूवात होणार आहे.

नव्या सीजनची सुरुवात #MeeToo मोहिमेने

२०१४ मध्ये अमिर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेऊन अमिर खान प्रेक्षकांसमोर येत आहे. या कार्यक्रमातून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. अनेक विषय प्रेक्षकांसमोर आणले जातात. ऑक्टोबर २०१४ ला ‘सत्यमेव जयते’चा शेवटचा सिझन प्रसारीत झाला होता. या नवीन सीझनची सुरूवात #MeeToo मोहिमेने होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक नवीन नावं, नवीन प्रकरणं यातून पुढे येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

#MeeToo चळवळ देशात मोठी होत आहे

आजच्या घडीला बॉलीवूड तसंच टॉलीवूडमध्येही #MeeToo चळवळ पसरत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात हे #MeeToo चळवळीचे लोण पसरते आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने, भारतात सर्वप्रथम #MeeToo मोहिमेने हा हॅशटॅग वापरला आणि तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा अनुभव शेअर केला. त्यांनतर रिचा चढ्ढा, कोंकणा सेन शर्मा, राधिका आपटे, इशिता दत्ता, मलिका दुआ, कंगना रनौत आणि आता तनुश्री दत्ता अशा अनेक अभिनेत्रींनी #MeeToo चळवळीला सपोर्ट केला आहे. तर दुसरीकडे श्री रेड्डी, पार्वती, सजिता मदातिल अशा दाक्षिणात्य अभिनेत्रींनीही #MeeToo मोहिमेने चळवळीला सपोर्ट केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -