घरमुंबईफेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापल्यामुळे पादचाऱ्यांचा मृत्यू

फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापल्यामुळे पादचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे मृतांमध्ये पादचाऱ्यांचा प्रमाण अधिक असल्याचे 'ब्लूमबर्ग फिलनथोर्फी इन्सेटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी' या स्वयंसेवी संस्थेचे आपल्या अहवालात म्हटले आहे.

मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या अपघातात मृतांच्या संख्येत घट झाली असून मृतांमध्ये पादचाऱ्यांचा आकडा मात्र अधिक आहे. मुंबईतील फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे मृतांमध्ये पादचाऱ्यांचा प्रमाण अधिक असल्याचे ‘ब्लूमबर्ग फिलनथोर्फी इन्सेटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ या स्वयंसेवी संस्थेचे आपल्या अहवालात म्हटले आहे. अपघातात मृत्यू होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरअसल्याची माहिती ‘ब्लूमबर्ग फिलनथोर्फी इन्सेटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ या स्वयंसेवी संस्था आणि मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेने मुंबई रस्ते सुरक्षा अभियान वार्षिक अहवालात म्हटले आहे.

 नेमके काय आहे अहवालात?

ग्लोबल रोड सेफ्टी आणि मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेने मुंबई रस्ते सुरक्षा अभियान वार्षिक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या अपघात मृत्यू होणाऱ्यांची संख्या याची मागील पाच वर्षाची आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार मुंबईत २०१५ मध्ये अपघातात मृत झालेल्याच्या तुलनेत २०१८ मध्ये मृतांची संख्या २२ टक्क्यांनी घटली असल्याचे म्हटले आहे. २०१५ मध्ये रस्ते अपघातात ६११ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये ही संख्या ४७५ वर आली आहे. तसेच २०१५ मध्ये जखमींची संख्या ४०२९ इतकी होती तर २०१८ मध्ये ही संख्या ३२९२ झाली असल्याचे अहवालात नमूद कऱण्यात आला आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेमुळे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्याच्या संख्येत घट झाली. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली आहे.

- Advertisement -

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक अपघात

२०१८ च्या अपघातात पादचारी यांच्या मृत्यूचे प्रमाण ५१ टक्के असून ४१ टक्के प्रमाण दुचाकीचालक आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्यांचे आहे. पादचाऱ्यांसाठी असणारे फुटपाथ फेरीवाल्यांमुळे व्यापले गेले असून अधिक फुटपाथ मेट्रोच्या कामात गेल्यामुळे पादचाऱ्याला चालण्यासाठी फुटपाथ उपलब्ध होत नाही. नाईलाजाने पादचाऱ्यांना रस्तावरुन चालावे लागत असल्यामुळे अपघातात मृत्यू होणाऱ्याची संख्या अधिक असल्याचा दावा ‘ब्लूमबर्ग फिलनथोर्फी इन्सेटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक अपघात असून त्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, २०१८ मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात ५२ जणांचा मृत्यू झाला असून पूर्व द्रुतगती महामार्गावर ३४ जणांचा अपघातात मृत्युमुखी पडले आहे. स्वामी विवेकानंद रोड (एसव्ही रोड) या ठिकाणी १६ जणांचा मृत्यू झाला असून सायन ट्रॉमबे रोडवर ९ जणांचा अपघात मृत्यू झाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड येथे ८ जणांचा मृत्यू झाला असून लिंक रोड येथे ७ जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -